जालना (प्रतिनिधी)ः जालना शहरातील मोती तलावात तथागत गौतम बुध्द यांच्या मुर्तीची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी जालना नगर पालीकेने ठराव घेऊन समिती स्थापन केली होती. परंतु गेल्या अनेक वर्षापासून मुर्ती स्थापनेसाठी होत असलेली टाळाटाळ पाहुन समाजाने आक्रमक भुमीका घेतली आहे. या संदर्भात दि. 3 मार्च रोजी अजंठा बुध्द विहार, आनंद नगर, जालना येथे पहिली बैठक पार पडली आहे.
जालना नगर पालीकेने गेल्या अनेक वर्षापासून समाजाला खुश करण्यासाठी मोती तलावात तथागत गौतम बुध्दाची मुर्ती बसवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी समिती स्थापन करुन सदरील कामाचे औरंगाबाद येथील एका शिल्पकाराला काम करण्याची वर्क ऑर्ड देण्यात आली होती. सदरील मुर्तीचे काम पुर्ण झाले आहे, परंतु जालना नगर पालीकेने मुर्ती जालना शहारातील मोती तलावात स्थापन करण्यास टाळाटाळ केली आहे. वारंवार पत्रव्यवहार करुन, मोर्चे आणि आंदोलने करुन देखील पालीकेने मुर्ती स्थापनेकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे समाजाने आता आक्रमक भुमीका घेत मुर्ती स्थापनेसाठी पुढाकार घेतला आहे. मुर्ती स्थापनेसाठी ठोस भुमीका घेण्यासाठी दि. 6 मार्च 2021 रोजी दुसरी बैठक मोतीबाग येथे सकाळी 10 वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मुर्ती स्थापनेसाठी ठोस निर्णय घेऊन समितीचे गठण करण्यात येणार आहे. पार पडलेल्या या बैठकीस रोहीदास गंगातिवरे, सुधाकर निकाळजे, अण्णासाहेब चितेकर, अरुण डोळसे, कपिल खरात, किशोर बोर्डे, सुनिल रत्नपारखे, सतिश वाहुळे, संदिप साबळे, संजय हेरकर, अनिल सरकटे, सुनिल नावकर, राजु गवळी भास्कर रत्नपारखे,भास्कर बोर्डे ,महिंद्र डी.रत्नपारखे, दिपक रत्नपारखे, कैलास बनसोडे, सुमित सुरडकर, गौतम सरकटे, संघदिप कुलतरखे, रवि खरात, राजु पारखे, राहुल रत्नापारखे, अमोल राऊत, विकास आदमाने, सतिश आदमाने, नितीन गोदाम, महिंद्र बी रत्नपारखे, बापु साळवे, सिध्दार्थ कनकुटे, अमित कांबळे, सुभाष कांबळे, किशोर कदम, दिपक बोबडे, अक्षयखरात, आनंद म्हस्के, बंडी बडगे, संदीप रत्नपारखे, प्रतिक लांडगे, अमोल जाधव, अनिरुध्द इंगळे, माधव जाधव, अनिल रत्नपारखे, रवि साबळे, कृष्णशेखर लोखंडे, भिमा शिंदे, शशीकांत काबंळे, राजु पारखे, आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply