ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र आणि केप्री फॉउंडेशनच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

March 29, 202213:15 PM 40 0 0

उरण  दि 28(संगीता ढेरे) : वनवासी कल्याण आश्रम आणि केप्री फौंडेशनचे वतीने साईनगर, वाशिवली वाडी तालुका खालापूर जिल्हा रायगड येथे जनजाती समाजाचा सामुदायिक विवाह आयोजित करण्यात आले होते.रायगड जिल्ह्यातील अनेक वाड्यातील 75 जनजाती जोडप्यांनी या सामुदायिक विवाहाचा लाभ घेतला. श्री व सौ.वैशाली अक्षय शिमग्या शिंगवा आणि श्री व सौ.गीता दशरथ अरुण वाघमारे या जोडप्यानी सामुदायिक विवाहात सामील होऊन आपले वयक्तिक लाख ते दीड लाख रु ची बचत झाली असे सांगितले.आणि आपल्या गावा साठी नवीन पायंडा रचला. सर्व दाम्पत्यास विवाह उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या तसेच तेथेच विवाह मंडपात सर्व नूतन दाम्पत्यांस विवाह प्रमाणपत्र देण्यात आली.
वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांत अध्यक्षा राज्य शासन पुरस्कार प्राप्त ठामताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सामुदायिक सोहळ्यास केप्री फौंडेशनचे राजेश शर्मा , बेणीप्रसाद राऊका, नीता जोशी राहुल रसाळ उपस्थित होते.केप्री फॉउंडेशन च्या नीता जोशी यांनी वनवासी कल्याण आश्रमाने आयोजित केलेल्या या जनजाती समाजाच्या सामुदायिक सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन योग्य ठिकाणी योग्य मदत जात असल्या बाबत समाधान व्यक्त केले
वनवासी कल्याण आश्रमाचे सचिव रवींद्र पाटील,कोषाध्यक्ष मोहन मुझुमदार , वेणूताई, ईश्वर कातकरी , सुचिता ताई जोशी यांनी छान नियोजन केले.उरण तालुक्यातून अध्यक्ष मनोज ठाकूर उपाध्यक्ष अजित भिंडे सचिव विश्वनाथ कातकरी, सहसचिव कुणाल सिसोदिया, सुनंदा कातकरी , रमेश फोफेरकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्या मीरा ताई पाटील , वामानं म्हात्रे, श्रीनाती बेबीताई कातकरी, कमलेश वर्मा, कु. आकाश शहा यांनी विशेष मेहनत घेतली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *