ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

विधवा महिलांना शासकीय योजनांच्या माध्यमातुन निवृत्तीवेतनाचा लाभ देण्याची प्रक्रिया एका महिन्यात पुर्ण करा   – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

November 3, 202116:40 PM 65 0 0

 जालना  :-    कोव्हीड-19 या महामारीमध्ये घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन अनेक महिला विधवा झालेल्या आहेत. या महिलांना मिशन वात्सल्य योजनेंतर्गत शासकीय योजनांच्या माध्यमातुन निवृत्ती वेतनाचा लाभ देण्याची प्रक्रिया एका महिन्यात पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृतीदलाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती एस.डी. लोंढे, जिल्हा माहिला व बालकल्याण अधिकारी श्रीमती आर.एन. चिमंद्रे, सहाय्यक आयुक्त कौशल्य विभाग संपत चाटे, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, डॉ. पद्मजा सराफ, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक उमेश कहाते, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी गजानन इंगळे, चाईल्ड लाईनचे व्यवस्थापक एम.आर. हिवाळे,एस.जी. कुलकर्णी, एस.बी. चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनामुळे विधवा झालेल्या महिलांचे पुनर्वसन होण्याच्यादृष्टीने शासनाच्या  विविध योजनेच्या माध्यमातुन लाभ देण्यात येत असताना संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ आदी योजनांच्या माध्यमातुन निवृत्ती वेतन देण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पुर्तता करुन घेत येत्या एक महिन्यात या महिलांना निवृत्ती वेतनाचा लाभ देण्याची कार्यवाही पुर्ण करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिल्या.

विधवा महिलांना भविष्यात सुरक्षिततेसाठी विम्याचे कवच असणे आवश्यक असुन अंगणवाडी सेविका, बचतगटातील महिलांच्या सहकार्याने महिलांचा सुरक्षा विमा, जीवन विमा आदी काढुन घेण्याबरोबरच महिलांनी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी तालुकानिहाय विशेष कँपचे आयोजन करण्यात येऊन महिलांचा कल असेल त्या क्षेत्रात प्रशिक्षण देण्यासाठी त्यांची निवड करण्यात येऊन त्यांना मोफत स्वरुपात प्रशिक्षण देण्यात यावे.  शेतकरी कुटूंबातील असलेल्या महिलांना शेतीच्या मशागतीसाठी बि-बियाणे, कृषी औजारे आदींचा प्राधान्याने लाभ देण्याबरोबरच शेतीच्या मशागतीसाठी आवश्यक ती माहिती पुरविण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *