ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

तडजोडीमुळे दोन्ही पक्षकारांचा विजयच होतो – जिल्हा न्यायाधिश श्री पल्लोड

March 28, 202214:18 PM 36 0 0

जालना प्रतिनिधी : वाद तडजोडीने लोक अदालत मध्ये मिटवल्यास त्यात दोन्ही पक्षकारांचा विजयच होतो असे प्रतिपादन तथार्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. पल्लोड यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग येथे आयोजित लोक अदालत मध्ये केले. यावेळी डॉ. योगेश धन्नावत व यात्रा कंपनी मध्ये तडजोड होऊन जेट एअरवेज जी बंद पडली होती. त्यामध्ये केलेली बुकींगचे पैसे त्यांना यात्रा कंपनीकडुन परत मिळाले व त्यामुळे तडजोड आधारे त्यांनी प्रकरण मिटवुन टाकले. याचप्रकारे अनेक प्रकरण तडजोडी आधारे ग्राहक आयोगापुढील निकाली लागले.
यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य मंजुषा चितलांगे, सदस्य निता कांकरीया, लोक अदालत पॅनल सदस्य अॅड. राजेंद्र चव्हाण, अॅड. सारिका चांडक, अॅड. महेश धन्नावत, अॅड. गवई, अॅड. वसीम शेख, अॅड. गौशिक, अधिक्षक श्री चव्हाण साहेब शिंदे मॅडम, चंद्रहास, केनेकर साहेब इत्यादी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *