ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दही हंडी खरेदीदार नसल्याने व्यावसायिक चिंतीत

August 30, 202114:13 PM 25 0 0

उरण (संगिता पवार) : कोरोनामुळे गेल्यावर्षी जन्माष्टमी साजरी झालीच नाही, ना दहीहंडी फुटल्या. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून शासनाने निर्बंधही मोठ्या प्रमाणावर शिथिल केले आहेत. तरीही यंदा या उत्सवाला परवानगी नाकारण्यात आली आहे. तरीही काही नियम अटींवर यंदा गोविंदा खेळण्यास परवानगी मिळेल, अशी आशा युवक तसेच व्यावसायिकांना आहे. गोविंदा दोन दिवसांवर आल्याने उरण बाजारात विविध रंगांच्या आकाराच्या हंड्या विक्रीसाठी आल्या आहेत.

५० टक्के तरी धंदा होईल की नाही अशी चिंता हंडी आणि शिग घेण्यासाठी अजून गोविंदा पथकांची पावलं दुकानाकडे वळलेली नाहीत. त्यामुळे यंदाही ५० टक्के तरी धंदा होईल की नाही अशी चिंता व्यावसायिकांना आहे.असे उरण तालुक्यातील मुलेखंड गावातील कुंभार सुरेखा कुंभार यांनी सांगितले .
४० रूपयांपासून ते अगदी२५० रूपयांपेक्षा अधिक किंमतीच्या हंड्या सध्या बाजारात ४० रुपयांपासून ते अगदी२५० रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या हंड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रस्त्याच्या कडेल राजपाल नाका , महराष्ट्र स्वीट ,महराष्ट्र ज्वेलर्स बाजूंला , ,गांधी चौक आदी ठिकाणी व दुकानांच्या बाहेर या हंड्या विक्रीसाठी ठेवलेल्या दिसत आहेत.
कृष्णजन्म झाल्यावर रात्री बारा वाजता काही ठिकाणी हंडी बांधून ती बालगोपाळांकडून फोडून घेतात. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला रंगतो . या हंड्या अगदी पाच फुटापासून १५ फुटांपर्यंत उंच बांधल्या जातात. परंतु यावेळी कोरोनामुळे एक तरी थर लावता येईल का अशी शंका उपस्थित केली जात आहे. गणपतीपूर्वी येणाऱ्या या मोठ्या सणासाठी सध्या बाजारपेठा सजल्या आहेत. गोविदांसाठी लागणाऱ्या रंगीबेरंगी हंड्या, दुकानांबाहेर लटकताना दिसत आहेत. मात्र ते खरेदीसाठी कोणी येत नसल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *