जालना (प्रतिनिधी) निधनानंतर/ आंबेडकरनगर ता.जि. जालना येथे आज दिनांक १७ ॲाक्टोबर रोजी सकाळी १० वाजेला महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण , मुंबई यांच्या तर्फे कायदे विषयक शिबीर आयोजित केले होते. यावेळी निधोना येथील प्रतिष्ठीत नागरिक व माजी सरपंच ॲड. शिवाजीराव आदमाने यांनी श्री रघुवंशी सर यांचे पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.
जालना जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायधीश श्री व्ही.जी. रघुवंशी सर यांनी निधोना आंबेडकर नगर येथील नागरिकांना कायद्या विषयी समज व गैर समज दुर करुन मोलाचे असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निधोना आंबेडकर नगर ग्रा.पं. चे ग्रामसेवक श्री आर.व्ही . कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाला निधोना आंबेडकरनगर येथील गावकरी श्री कृष्णा आदमाने, श्री सुभाष बोर्डे , सांडू रगडे, विजय आदमाने, विनायक आदमाने, रंगनाथ आदमाने यांच्या सह मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.
Leave a Reply