जालना/प्रतिनीधी – महाराष्ट्र अॅमेच्यार नेटबॉल असोसिएशन व नागपुर जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ते 14 ब्रुवारी 2021 दरम्यान नागपुर येथे होणार्या राज्यस्तरीय ज्युनीयर नेटबॉल स्पर्धेसाठी जालना जिल्हा नेटबॉल असोसीएशनच्या वतीने दिनांक 9 ब्रुवारी 2021 मंगळवार रोजी निवड चाचणीचे आयोजन देवगिरी इंग्लिश स्कुल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौली, जुना जालना येथे सकाळी 11 वाजल्यापासुन करण्यात आलेले आहे.
निवड चाचणीमध्ये सहभागी होण्याकरीता केाणतेही नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नसुन ज्यांची जन्मतारीख 1 मार्च 2002 नंतरची आहे असे मुले व मुली यात सहभागी होवु शकतील. अधिक माहीतीसाठी जिल्हा संघटनेचे सचिव शेख चाँद पी.जे. मो.नं. 9822456366 किंवा जयकुमार वाहुळे, मंगेश सोरटी, नितीन जाधव, संतोष वाघ, यांच्याशी संपर्क साधावा.
तरी निवड चाचणीमध्ये जास्तीत जास्त खेळाडुंनी सहभागी व्हावे असे आवाहन जालना जिल्हा ऑलंम्पीक असोसिएशन व जालना जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक बाला परदेसी व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
Leave a Reply