ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पीसीपीएनडीटी कार्यक्रमाअंतर्गत कार्यशाळेचे आयोजन

November 2, 202112:47 PM 92 0 0

जालना   :- राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पीसीपीएनडीटी कार्यक्रमांतर्गत (गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निवड प्रतिबंध कायदा 1994) जिल्ह्यांतील समुचित प्राधिकारी यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे अध्यक्ष शासकीय अभियोक्ता, जिल्हा व सत्र न्यायालय, जालना ॲड दिपक कोल्हे यांनी दिपप्रज्वलन करुन उद्घाटन केले. पीसीपीएनडीटी कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, यांनी केले. त्यांनी पीसीपीएनडीटी कार्यक्रमांमधील गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निवड प्रतिबंध कायदा 1994 कामाची रुपरेषा थोडक्यात सांगितली.

या कार्यशाळेत रेडीओलॉजिस्ट डॉ. विजय वाकोडे यांनी सोनोग्राफी केंद्राची तपासणीविषयी मार्गदर्शन केले व डॉ. सरोज घोलप यांनी गर्भपात केंद्राची तपासणीविषयी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिक्षक तथा समुचित प्राधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कार्यशाळेचे अध्यक्ष ॲङ दिपक कोल्हे, यांनी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निवड प्रतिबंध कायदा 1994 पीसीपीएनडीटी कायद्यातंर्गत गुन्हा कसा दाखल करावा या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यानंतर कार्यशाळेत जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय जालना यांनी पीसीपीएसडीटी कायद्याअंतर्गत जालना जिल्ह्यात कुठेही कायद्याचे उल्लंघन आढल्यास 1800-233-4475 या टोल फ्री क्रमांकावर व www.amchimulgi.gov.in या संकेतस्थळावर तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले. तसेच शासनाच्या खबरी बक्षिस योजने अंतर्गत जिल्ह्यात कुठेही गर्भलिंगनिदान व अवैध गर्भपात होत असल्याचे माहिती देणा-यास 1 लक्ष रुपये बक्षिस देण्यता येईल असे सांगितले.
पीसीपीएनडीटी कार्यशाळेचे सुत्रसंचालन डॉ. मिनल देवळे यांनी केले. ॲड सोनाली कांबळे, विधी सल्लागार, पीसीपीएनडीटी यांनी आभार व्यक्त केले. तसेचे कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी श्रीमती तेजस्वीनी वाघमारे, मनोज जाधव, संदीप रगडे यांनी सहकार्य केले. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *