ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पंतप्रधान मोदी यांच्या अघोषीत आणीबाणी विरुध्द जालन्यात कॉग्रेसचे आंदोलन पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या घोषणा बाजीने वेधले जालनेकरांचे लक्ष

June 27, 202114:19 PM 73 0 0

जालना (प्रतिनिधी) ः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्ता कार्यकाळात देशामध्ये अघोषीत आणीबाणी लागू झाली आहे. याविरोधात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती चे औचित्य साधुन जालना शहर व जिल्हा कॉग्रेस कमिटिच्या वतीने आज शनिवारी मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा जवळ आंदोलन करण्यात आले.

https://indianfast.com/

https://indianfast.com/

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ. राजेश राठोड, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके पाटील, ज्ञानेश्‍वर भांदरगे, प्रा. सत्संग मुंढे, प्रभाकर पवार, शहराध्यक्ष शेख महेमुद, तालुका अध्यक्ष वसंत जाधव, राहुल देशमुख, विठ्ठलसिंग राजपुत, राम सावंत, गटनेते गणेश राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख म्हणाले की, राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण हे केवळ भाजपा आणि केंद्रातील मोंदी सरकारच्या वेळकाढु धोरणामुळे संपुष्टात आले आहे. देवेंद्र फडणविस हे राज्याचे मुख्यमंत्री आणि पंकजाताई मुंढे या राज्याच्या सामाजिक न्यायमंत्री असतांना या दोघांनीही केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारमधील केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्याकडे पत्रव्यवहार करुन ओबीसी समाजाच्या जनगणनेचा डेटा देण्याची मागणी राज्य सरकारच्या वतीने केली होती. मात्र केंद्रातील भाजपा सरकारने सदर डेटा जाणिवपुर्वक दिला नाही. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वेाच्च न्यायालयाकडुन रद्द करण्यात आले. सदर आरक्षण रद्द होण्यासाठी पुर्णपणे भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप करुन ज्यांनी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द व्हावे यासाठी प्रयत्न केले तीच मंडळी आज ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी आंदोलन करुन नौटंकी करत असल्याची टिका राजाभाऊ देशमुख यांनी यावेळी केली. तत्त्पुर्वी प्रा. सत्संग मुंढे यांनीही आपल्या भाषणातुन केंद्रातील भाजपा सरकारसह राज्यातील भाजपा नेत्यांवर टिका केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नगरसेवक महाविर ढक्का, आरेफ खान, किशोर गरदास, सय्यद अजहर, शेख शकील, संजय भगत, दिनकर घेवंदे, वाजेद खान, संगिता पाजगे, आनंद लोखंडे, चंद्रकांत रत्नपारखे, फकीरा वाघ, बाबुराव सतकर, चंदाताई भांगडीया, मंगलताई खांडेभराड, अशोक नावकर, राधेशाम जायस्वाल, रघुनाथ ताठे, राधाकिशन दाभाडे, शिवप्रसाद चितळकर, राजु पवार, सागर ढक्का, गुरुमितसिंग सेना, संभाजी गुठे, गोपाल चित्राल, प्रविण रत्नपारखे, संतोष खरात, विष्णु भालेराव आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *