जालना (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे हे दि. 14फेबु्रवार रविवार रोजी मराठवाड्याच्या दौर्यावर येत असून यादिवशी जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा जालना येथे दुपारी 12 वाजता जाहिर सत्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे हे प्रथमच मराठवाड्याच्या दौर्यावर येत आहेत. दि. 14फेबु्रवारी रविवार रोजी औरंगाबाद येथे औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचा सत्कार स्विकारल्यानंतर श्री हंडोरे यांचे दुपारी 12 वाजेपर्यंत जालना येथे आगमन होणार आहे. जालना शहरातील सर्व्हे नंबर 488 मधील शासकीय विश्रामगृहात जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजीत करण्यात आला आहे.
यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा आ. कैलास गोरंट्याल, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ. राजेश राठोड, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल, डॉ. संजय लाखे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, भिमराव डोंगरे, विजय कामड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या विविध आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष व त्यांचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिकेचे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि नगरसेवक, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, गटनेते गणेश राऊत, जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी, राम सावंत, चंद्रकांत रत्नपारखे, संजय शेजुळ, अरूण घडलींग, कृष्णा पडूळ आदींनी केले आहे.
Leave a Reply