ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

काँगे्रस पक्ष जनसामान्यांच्या पाठीशी-डॉ. वजाहत मिर्झा

January 17, 202215:41 PM 39 0 0

जालना (प्रतिनिधी) ः काँगे्रस पक्षाने नेहमी जनसामान्यांचा विचार करून विकास आणि त्यांच्या हिताचे धोरण स्विकारल्यामुळेे समाजामध्ये सामाजिक न्याय प्रतिमेला गती मिळाली आहे. म्हणून जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणूकीत काँग्रेस पक्षाला विजयी करण्याचे आवाहन विधान परिषदेचे सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी विविध ठिकाणी शनिवार रोजी आयोजित प्रचार सभेत केले.

जालना जिल्हा काँगे्रस कमिटीच्या वतीने आयोजित जालना जिल्ह्यातील बदनापूर, मंठा, जाफ्राबाद येथे शनिवार रोजी काँगे्रस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. वजाहत मिर्झा बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्हा काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे होते तर व्यासपिठावर प्रदेश काँगे्रसचे सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी रामकिशन ओझा, आ. राजेश राठोड, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, अभाका सदस्य भिमराव डोंगरे, शहर काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, सुभाष मगरे, अन्नासाहेब खंदारे, जिल्हाध्यक्ष जावेद बेग, राजेश काळे आदि मान्यवर यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते. पुढे बोलतांना आ. डॉ. वजाहत मिर्झा म्हणाले की, जालना जिल्हा हा काँगे्रसचा एके काळी बाले किल्ला होता परंतू संघटनात्मक बांधणी आणि जनसंपर्क तुटल्याने पक्ष कमकुवत होत गेला. पण काँगे्रस पक्षाने आपले विचार धोरण बदलले नाही, आज देशाला आणि राज्याला काँगे्रसच्या विचाराची खरी गरज आहे. हि बाब कार्यकर्त्यांनी लक्षात घेवून काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी स्वतःला झोकून द्यावे असे आवाहन श्री.मिर्झा यांनी केले. याप्रसंगी जिल्हा प्रभारी रामकिशन ओझा, जिल्हाध्यख राजाभाऊ देशमुख, आ. राजेश राठोड, सुरेशकुमार जेथलिया, भिमराव डोंगरे यांनी आपल्या भाषणातून काँगे्रस उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी तालुका काँगे्रसचे अध्यक्ष लक्ष्मण म्हसलेकर, सुरेश गवळी, निळकंठ वायाळ, शेख अनवर, शेख असलम, शबाब कुरेशी, कबीर तांबोळी, शेख बबलु, जहीर यार खान, जुनेद खान आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होेते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *