ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अग्निपथ योजने विरोधात कॉग्रेस पक्षाचे जोरदार धरणे आंदोलन

June 28, 202212:53 PM 14 0 0

जालना (प्रतिनिधी) : भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रियेत बदल करुन जाहिर केलेली अग्निपथ योजना तरुणांवर अन्याय करणारी योजना आहे. ही योजना ताबडतोब रद्द करण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी रोजी जुना जालना गांधी चमन येथे जालना जिल्हा व शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार धरणे आंदोलन करुन केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करुन त्यांच्या विरोधात गगन भेदी घोषणा देण्यात आल्या.


केंद्रातील भाजप सरकारने सैन्य दलातील भरती प्रक्रियेत बदल करुन अग्निपथ योजना जाहिर केल्यामुळे देशातील तरुण हा रस्त्यावर उतरलेला आहे. प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी राज्यभर कॉग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. केंद्र शासनाने ताबडतोब ही योजना मागे घेवून देशातील तरुणांवर होणाऱ्या अन्याय थांबववा नसता कॉग्रेस पक्ष देशाच्या नेत्या सोनिया गांधी व खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतल्याशिवाय राहणार नाही. यावेळी शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की, केंद्रातील भाजप सरकार सैन्य दलातील भरती प्रक्रियेत बदल करुन युवकांच्या भवितव्याशी खेळत आहे. भाजप आणि आरएसएस ला त्यांच्या विचारांची शक्ती निर्माण करायची आहे. त्यांनी अग्निपथ योजना जाहिर करुन केवळ युवकांना 4 वर्षाची सैन्यामध्ये नौकरीचे हमी देवून त्यानंतर त्यांच्यावर बेरोजगाराची कुऱ्हाड पडणार आहे. हे प्रशिक्षीत बेरोजगारांना आरएसएस मध्ये संधी देतील हे देशासाठी घातक ठरणार आहे. हे जनतेने आताच ओळखून घेणे गरजेचे आहे असे श्री शेख यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, प्रा. संत्सग मुडे, राम सांवत, अण्णासाहेब खंदारे, वसंत जाधव, विठ्ठलसिंग राजपूत, जावेद बेग, जावेद बागवान, कृष्णा पडुळ, नंदाताई पवार आदींनी आपल्या भाषणातून केंद्र शासनाचा निषेधकरुन अग्निपथ योजना मागे घेण्यात यावी अशी जोरदार मागणी केली. धरणे आंदोलनात केंद्र शासन आणि मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात येवून अग्निपथ योजना मागे घ्यावी, सोनिया गांधी, खा. राहुल गांधी यांच्या जिदांबादच्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी डॉ. विशाल धानूरे, चंद्रकांत रत्नपारखे, शेख शमशोद्दिन, आनंद लोखंडे, ज्ञानेश्वर शिंदे, सय्यद करीम बिल्डर, संभाजी गुडे, अफसर चौधरी, धर्मा खिलारे, किशन जेठे, बाबासाहेब सोनवणे, विष्णु गजर, दत्ता शिंदे, बद्री जाधव, मंजू यादव, योगेश पाटील, सदाशिव भुतेकर, बद्री भनंसाडे, सलीम काजी, रहिम तांबोळी, अजिम बागवान, फकीरा वाघ, राजू पवार, शिवाजी गायकवाड, मुफस्सीर कुरेशी, शेख असलम, शेख लतीफ, विठ्ठल डोंगरे, कृष्णा चव्हाण, गणेश चांदोडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते. शेवटी उपस्थितींताचे रहिम तांबोळी यांनी आभार मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *