ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

काँग्रेस चे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. महेंद्रशेठ घरत यांनी घेतले बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या समाधी चे दर्शन

September 8, 202112:51 PM 1 0 0

रायगड  प्रतिनिधी (अश्विनी निलेश धोत्रे) : आज शनिवार दि.4 सप्टेंबर रोजी. रायगड जिल्हा काँग्रेस चे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. महेंद्रशेठ घरत यांनी.महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कोकणचे भाग्यविधाते बॅरिस्टर ऐ.आर अंतुले साहेब यांच्या जन्मगांव असलेल्या आंबेत या गावी जाऊन त्यांच्या माजारीवर चादर अर्पण करून आशीर्वाद घेतले. यावेळी अंतुले साहेबांचे पुतणे मुश्ताक भाई अंतुले, R.C भाई घरत. व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


महेंद्र घरत साहेब हे रायगड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष झाल्यावर जिल्हा दौरा करण्या अगोदर त्यांना अंतुले साहेबांच्या जन्मगावी जाऊन त्यांच्या समाधी चे दर्शन घेऊन. आपल्या कार्याला सुरवात करण्यासाठी ते आज अंतुले साहेबांच्याआंबेत या गावी आले होते.या मोठया संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते व मोठया उत्सहाणे आंबेत वाशियांनी नवनिर्वाचित रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री.महेंद्रशेठ घरत साहेबांचे स्वागत केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *