ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत बैठक

September 5, 202117:10 PM 64 0 0

जालना (प्रतिनिधी) ः केंद्रामध्ये कॉग्रेस पक्षाचे सरकार असतांना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळापासून ओबीसी संघटकांतील बारा बलुतेदारांना 10 टक्के आरक्षण देण्यासाठी व्हि. कृष्णय्या आयोगाची स्थापना करण्यात आल्यानंतर ओबीसी आरक्षणासाठी चार विभागण्या करुन ओबीसी घटकांचे उपवर्गीकरण करण्यात आले. या आयोगाकडुन अहवाल प्राप्त न झाल्यामुळे केंद्र सरकारने सदर मुद्दतवाढ देवून न्या. रोहिणी आयोग स्थापन केला. या आयोगाने नुकताच आपला अहवाल केंद्र शासनाकडे सादर केल्यामुळे बारा बलुतेदारांना 10 टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्‍वभुमीवर बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या समोर बारा बलुतेदार आणि ओबीसी समाजाच्या समस्या मांडल्याने श्री. पटोले यांनी या मागण्या सोडविण्यासाठी तातडीने दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई येथे बैठक बोलावली असून महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेल्या प्रश्‍नांना वाचा फोडल्यामुळे न्याय मिळण्याचा मार्ग प्रशस्थ झाला आहे.

मुंबई येथे आयोजित बैठकीत बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी राज्यातील बारा बलुतेदार महासंघाच्या पदाधिकार्‍यांसहीत भटकेविमुक्त, मुस्लीम, ओबीसी या वंचित वर्गाच्या प्रतिनिधींना निमंत्रीत केले असून या बैठकीत ओबीसीच्या विविध प्रश्‍नावर सविस्तर चर्चा होवून श्री पटोले हे सदर समस्या शासन दरबारी मांडणार असल्यामुळे बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याण दळे हे राज्यातील ओबीसी समाज घटकांचे विविध प्रश्‍न मांडून ते सोडविण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करणार आहे. बारा बलुतेदाराना ओबीसी आरक्षणाचा पुर्णपणे लाभ मिळावा म्हणुन केंद्रातील कॉग्रेस पक्षाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सन 2014 मध्ये मा. न्यायमुर्ती व्हिकृष्णय्या आयोगाची स्थापना केली होती. सदर आयोगाने दिलेल्या मुद्दतीत आपले काम पुर्ण न केल्यामुळे आयोगास मुद्दतवाढ देवून सन 2017 मध्ये न्यायमुर्ती जि. रोहिणी आयोगाची नियुक्ती करण्यात आली. आणि ओबीसीच्या उपवर्गीकरणासाठी आयोगाने यामध्ये 4 विभागण्या करुन त्यातबारा बलुतेदार, भटके विमुक्त व मुस्लिम ओबीसी या वंचित वर्गाला 10 टक्के आरक्षणाची शिफारस केली आहे. सदर रोहिणी आयोगाने आपला अहवाल देशाचे पंतप्रधान व मा. राष्ट्रपती यांना सादर केला आहे. या आयोगाच्या शिफारशी राज्यात ताबडतोब लागू करण्यात याव्यात म्हणून आपण आपल्या स्तरावर या संदर्भात शिफारस करावी, राज्य शासनाकडे प्रस्तावित असलेले बारा बलुतेदारासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन हेवून ते कार्यान्वीत करण्यात यावे. विशेष म्हणजे कॉग्रेच पक्षाच्या निवडणुक जाहिरनाम्यात या महामंडळाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच बारा बलुतेदार महासंघाने यासाठी वेळोवेळी पाठपुरावा देखील केलेला आहे, राज्यातील महाज्योती संस्थेकडुन बारा बलुतेदार व मुस्लिम ओबीसी यांच्या मुलीसाठी 50 टक्के आरक्षीत जागा ठेवण्यात याव्यात व त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, राज्यातील बार बलुतेदार कुशल कारागिरांच्या व्यवसायास लघु उद्योगाचा दर्जा देण्यात येवून त्यांच्या उद्योग निर्मितीसाठी औद्योगीक वसाहतीत अल्प दराने जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, राज्यातील बारा बलुतेदारांना उद्योग व्यवसायासाठी प्रश्‍न व सशोधन केंद्र उभारण्यात यावे, प्रताप गडाच्या पायथ्याशी श्री. संत गाडगेबाबा स्मारक व जीवा माहले यांचे स्मारक बांधन्यासाठी तातडीने कारवाई होवून याची अमलंबजावणी करण्यात यावी. तत्कालीन मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भात अधिकृत घोषणा केलेली आहे, राज्यातील आर्थिक विकास महामंडळावर बारा बलुतेदार भटके विमुक्त व मुस्लिम ओबीसी यांना संधी देण्यात यावी, राज्यातील बारा बलुतेदार भटके विमुक्त व मुस्लिम ओबीसी (7/12 नसलेल्या भुमीहिनांना शेतकर्‍यांप्रमाणे शासनाचे लागु असलेल्या धोरणाचा फायदा देण्यात यावा, राज्यातील एस.बी.सी. समाजाच्या संदर्भात शासनाने दि. 29 डिसेंबर 2019 रोजी शासन निर्णय जारी केलेला आहे. यामध्ये एस. बी. सी या समाज बांधवाना योग्य न्याय देण्यासाठी शासन निर्णयामध्ये तातडीने सुधारणा करण्यात यावी, राज्यातील ओबीसी समाजाची जात गणना करण्यात यावी व राज्यात होवू घातलेल्या स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागु होत नाही तो पर्यंत निवडणुका घेण्यात येवू नये. अशा विविध मागण्या या बैठकीत बाराबलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याण दळे हे मांडणार आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *