जालना (प्रतिनिधी) ः देशात वाढलेली प्रचंड महागाई आणि गगनाला भिडलेले पेट्रोल-डिझेलचे दर यामुळे सर्वसामान्य जनता भरडून गेली आहे. यामुळे केंद्र शासनाविरूध्द महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी संपुर्ण राज्यात आंदोलन उभारले असून त्या अनुषंगाने जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. 16 जुलै शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता मामाचौक येथून भव्य सायकल रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली आहे.
शहर काँग्रेसच्या वतीने सायकल रॅलीच्या पुर्वतयारीसाठी रविवार रोजी बैठक घेण्यात आली असून रॅलीच्या यशस्वीतेसाठी पुर्ण तयारी करण्यात आली आहे. मामाचौक येथून सायकल रॅलीस प्रारंभ होणार असून सदर रॅलीचा समारोप जुना जालना गांधीचमन येथे करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे मराठवाडा विभागीय समन्वयक म्हणून जितेंद्र देहाडे यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे.
या रॅलीत आजी-माजी प्रदेश पदाधिकारी, विविध आघाडयांचे जिल्हाध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन राजाभाऊ देशमुख, आ. कैलास गोरंट्याल, आ. राजेश राठोड, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, गटनेते गणेश राऊत, राम सावंत, अरूण घडलिंग, संजय शेजुळ आदींनी केले आहे.
Leave a Reply