ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

संविधान दिन संपन्न

November 26, 202115:32 PM 42 0 0

संविधान स्तंभ रॅली व जालना नगरपरिषद यांच्य संयुक्त विद्यमाने संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते, सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कदिम जालना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेशजी टाक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र राख,महावीर ढक्का,नगरसेवक विजय चौधरी,मुख्याधिकारी शिंदे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान रॅली चे अध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी केले. यावेळी राजेंद्र राख, मुख्याधिकारी शिंदे, रमेश देहेडकर व विजय चौधरी यांनी संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले तर अध्यक्षपदावरून बोलताना महेशजी टाक यांनी संविधान याबद्दल माहिती देऊन संविधान प्रस्तविकेचे वाचन केले. दि.26/11 बॉम्ब स्फोटातील शहीदांनाश्रद्धांजली वाहण्यात आली.


याप्रसंगी नगरसेवक राहुल हिवराळे, नगरसेवक हरीश देवावाले,नगरसेवक संजय भगत,नगरसेवक विनोद रत्नपारखी,राम गायकवाड अशोक उबाळे, राजेंद्र गोरे, विजय लहाने, नागेश मिरधे, शुभम घेवंदे, योगेश रत्नपारखी,सुभाष देविदान, के.सी.साळवे, कुकडेजा,किरण साळवे, शेख इंब्राहिम, अफसर भाई चौधरी, नगरपालिका कर्मचारी व पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन रमेश देहेडकर यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *