नांदेड – जगातला सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी असलेला बौद्ध धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या हक्कवंचितांना दिला. २० व्या शतकात बुद्धांचा धम्म त्यांनीच जनमानसात रुजवला. हाच आशय आणि विषय घेऊन खुरगाव येथे बुद्ध चिंतन आणि मंथनावर पायाभरणी होत असलेल्या भरीव अशा धम्मचळवळीचेच बांधकाम या ठिकाणी होत आहे. खुरगाव येथे बुद्धाच्या धम्मसौंदर्याची निर्मिती होत आहे, असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्र नांदेड पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले. ते तालुक्यातील खुरगाव येथे नवदीक्षांताच्या श्रामणेर जीवनास सुरुवात होत असतांना घेण्यात आलेल्या समारंभावेळी बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, वृक्षारोपण, अंधश्रद्धा निर्मूलन, धम्मसंदेश व धम्मदान यात्रा, धम्मसंवाद, धम्मदेसना, धम्मकाव्यमैफिल, श्रामणेर दीक्षा आदी उपक्रमांतून ही सौंदर्यनिर्मिती होते आहे. तसेच ती अधिकतम मानव्याच्या हस्तांतरणाची अविरत चालणारी प्रक्रिया आहे. श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अनेक श्रामणेर हे पुढील काळात धम्मचळवळीची मजबूत धुरा खांद्यावर पेलतील आणि त्यांच्याजवळ बुद्ध तत्त्वज्ञानाची जीवनभर पुरणारी वैश्विक शिदोरी त्यांच्याजवळ असेल, ह्यात शंका नाही. ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे माघपौर्णिमापूर्व विशेष श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १७ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे.
मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या चोवीस उपासकांना प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या भिक्खू संघाकडून विधीवत श्रामणेर दीक्षा देण्यात आली तसेच त्यांचा नामकरण सोहळा घेण्यात आला. हा सोहळा भदंत सत्यशिल महाथेरो, भ. संघरत्न, भ. सुदर्शन, भ. चंद्रमणी, भ. धम्मकिर्ती, भ. श्रद्धानंद, भ. शीलभद्र, भ. सदानंद यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माधवदादा जमदाडे, उपाध्यक्ष मधुकर झगडे, एल. आर. कांबळे, धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे संकल्पक गंगाधर ढवळे, सुगावचे सरपंच संतोष लोकडे, संदिप सोनकांबळे, सुभाषदादा खिल्लारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले. श्रामणेर म्हणून संघर्ष खिल्लारे, दीपक पोहरे, किरण पोहरे, रणजीत पोहरे, धम्मदीप पोहरे, कार्तिक आठवले, मयुर पोहरे, ऋषिकेश गवारे यश गवारे, संघर्ष नरवाडे, अनिकेत सोनाळे, वैभव चवडेकर, प्रज्वलित येवले, शैलेश इंगोले, अनिकेत सोनकांबळे, महेंद्र भगत, सतिश तुपसमिंदर, बुद्धरक्षित शेळके, सिद्धांत साळवे, शुभम दवणे, प्रशांत कांबळे, भीमराव थोरात, रामा लोणी, संजय भुरे यांना दीक्षा देण्यात आली.
समारंभाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीप व धूप पूजन करण्यात आले. केशवपन विधीनंतर याचकांना काषायवस्र व भीक्षा पात्र प्रदान करण्यात आले. त्यांनतर या नवदीक्षितांनी दसशील ग्रहण केले तर उपासकांना त्रीसरण, पंचशील देण्यात आले. श्रामणेर दीक्षितांच्या नावांची घोषणा केल्यानंतर समारंभाची सांगता करण्यात आली. यावेळी उमाजी नरवाडे, विठ्ठल नरवाडे, आप्पाराव नरवाडे, नागोराव नरवाडे, दिलिप नरवाडे, राहुल नरवाडे, अनिता नरवाडे, करण भरणे, बळीराम तुपसमिंदर, दिलिप आठवले, गंगासागर आठवले, धिरज साखरे, नरहरी लोकडे, रामराव नरवाडे, सिद्धार्थ नरवाडे, संतोष पोहरे, सूर्यमोहन तुळसे, वैशाली नरवाडे, कल्पना सोनाळे, सचिन सोनकांबळे, दीपाली सोनकांबळे, निला सोनकांबळे, आश्विनी सोनकांबळे, कैलास बलखंडे, अनिल अहिरे, संभाजी राऊत, रामचंद्र जोंधळे यांच्यासह अनेक गावांतील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
श्रामणेर प्रशिक्षण केंद्र वाहनतळ परिसरात वृक्षारोपण
नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास भेट दिली. त्यावेळी केंद्राच्या पार्किंग परिसरात बोधीवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. गेल्या सात महिन्यांपासून याच परिसरात विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघ, रिपब्लिकन हक्क परिषदेचे रमेशदादा सोनाळे, सुखदेव चिखलीकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलिस निरीक्षक गुट्टे, मधूकर नरवाडे, उमाजी नरवाडे, मधुकर नरवाडे, साहेबराव नरवाडे, शंकर गोडबोले, नागोराव नरवाडे, साहेबराव नरवाडे, आप्पाराव नरवाडे यांची उपस्थिती होती.
Leave a Reply