ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना जिल्ह्यात व मतदारसंघात गुणवत्तापूर्ण रस्ते बांधणीस सर्वोच्च प्राधान्य देणार अंबड तालुक्यातील दळणवळणाला मिळणार अधिक गती : पालकमंत्री राजेश टोपे

December 4, 202114:17 PM 58 0 0

जालना दि. 2 :- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी विशेष प्रयत्न करुन राज्य मार्ग 61 ते चिंचखेड-बनटाकळी-झिर्पी-कौडगाव-दहिगव्हाण खु.-बनगाव-सिध्देश्वर पिंपळगाव-खापरदेव हिवरा-एकलहेरा-भनंग जळगाव रामा-26 साडेगाव रस्ता प्रजिमा-55 किमी 2/00 ते 32/00 चे मजबुतीकरण व डांबरीकरण जिल्हा मार्ग रस्ता मंजूर करुन घेतला.

सुमारे 13 कोटी 50 लक्ष रुपयाच्या जिल्हा मार्गाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या रस्त्यामुळे अंबड तालुक्यातील दळणवळण अधिक सुलभ होणार असल्याने वेळ व पैशाची बचत होणार आहे. याबरोबरच मालवाहतुकीच्या दृष्टीनेही हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्यामुळे व्यावसायासह विकासाला चालना मिळणार असल्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. येणाऱ्या काळात रस्त्यासाठी जास्तीत जास्त निधी आणून गुणवत्ता पूर्ण रस्ते बांधकामाला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे देखील पालकमंत्री श्री टोपे यांनी स्पष्ट केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *