ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

इकोफ्रेंडली मखराला ग्राहकांची पसंती

August 18, 202215:37 PM 14 0 0

उरण  (राघवी ममताबादे ) : सध्या गणेशोत्सव काही दिवसावर आले आहे. सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरे केले जाणार आहे. सध्या अनेक ग्राहकांचा ओढा पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे आहे. त्यामुळे उरण बाजार पेठेत तसेच पूर्व विभागात इकोफ्रेंडली कागदी पुठठ्या पासून बनविलेले मखरे मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध आहेत.

उरण पूर्व विभागात पिरकोन (फणसवाडी सेक्टर 11)ता. उरण, जिल्हा रायगड येथे कागदी पुट्ट्या पासून इकोफ्रेंडली मखर विक्रीस उपलब्ध आहेत. इकोफ्रेंडली मकर 2000 रुपया पासून उपलब्ध आहेत. इकोफ्रेंडली मखर वापरल्याने पर्यावरणाची होनी होत नाही. इकोफ्रेंडली मखर वापरल्याने कोणतेही साईड इफेक्ट नाही.उलट पर्यावरणाचे संरक्षण होते. त्यामुळे सर्वांनी इकोफ्रेंडली मखराचा वापर करून इकॉफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा.असे आवाहन सांज आर्टचे मालक सतीश चंद्रकांत म्हात्रे यांनी केले आहे.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *