ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कंटेनर ट्रेलर, इनोव्हा कार, क्रेटा कार, टेम्पो, ट्रकचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी

February 16, 202113:11 PM 35 0 0

रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नवी मुंबईतील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनजीक फुडमॉलजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. कंटेनर ट्रेलर, इनोव्हा कार, क्रेटा कार, टेम्पो, ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात पाचही गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

दरम्यान , या अपघातात नवी मुंबईतील डॉक्टर वैभव झुंजारे यांची आई, पत्नी आणि 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. डाॅ. वैभव झुंजारे नवी मुंबई महानगरपालिकेत पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. जखमींपैकी दोघांना पनवेल, दोघांना वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातातील मृतांची नावे
1. मंजू प्रकाश नाहर, वय 58 वर्ष, गोरेगाव पश्चिम
2. डॉ. वैभव वसंत झुंझारे, वय 41 वर्ष, नेरुळ, नवी मुंबई
3. उषा वसंत झुंझारे, वय 63 वर्ष, नेरुळ, नवी मुंबई
4. वैशाली वैभव झुंझारे, वय 38 वर्ष, नेरुळ, नवी मुंबई
3. श्रीया वैभव झुंझारे, वय 5 वर्ष, नेरुळ, नवी मुंबई

कसा झाला अपघात?
अपघातग्रस्त दोन कारमधील कुटुंबीय एकत्र पुण्याला एका कार्यक्रमाला गेलो होते. पुण्याहून परतत असताना हा अपघात झाला. एका कंटेनरने मागच्या बाजून टेम्पोला धडक दिली. या धडकेमुळे टेम्पो पलटी झाला आणि मागून येणाऱ्या या दोन कार टेम्पोला धडकल्या. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने या दोन्ही गाड्यांनी धडक दिल्याने अपघाताची भीषणता वाढली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *