ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जेएनपीटी बंदरात 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत कंटेनर वाहतुकीत झाली 40.40% ची वाढ

October 12, 202114:00 PM 6 0 0

उरण ( संगिता पवार) भारतातील प्रमुख कंटेनर बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात जेएनपीटी मध्ये आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत कंटेनर वाहतूकीमध्ये 40.40% ची वाढ झाली. जेएनपीटी बंदरात आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत 2,703,051 टीईयू हाताळणी केली गेली जी वर्ष 2020-21 च्या पहिल्या सहमाहीतील 1,925,284 टीईयूच्या तुलनेत 40.40% अधिक आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत वाहतूक हाताळणीमध्ये रेल्वेचा हिस्सा 18.04% होता. सप्टेंबर 2021 मध्ये एकूण 452,108 टीईयू कंटेनर हाताळणी झाली जी सप्टेंबर 2020 च्या तुलनेत 18.86% अधिक आहे. जेएनपीटी बंदरातील एनएसआईजीटी ने सप्टेंबर 2021 मध्ये 1,00,814 टीईयूची हाताळणी करून एका महिन्यात 1 लाख टीईयू कंटेनर हाताळणी करण्याचा विक्रम केला, जो एनएसआईजीटीच्या स्थापनेनंतर आतापर्यंतची सर्वाधिक आहे.


जेएनपीटी बंदराच्या पहिल्या सहामाहीतील कामगिरीविषयी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले, “जगातील प्रगत व आघाडीच्या बंदरांच्या बरोबरीने ग्राहकांना सुविधा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या आघाडीवर आम्ही विविध उपाययोजना केल्या आहोत व करीत आहोत. अलीकडेच, केंद्रीय बंदरे, नौवहन, जलमार्ग आणि आयुष मंत्री श्री सर्वानंद सोनोवाल यांनी जेएनपीटीमधून ड्वार्फ कंटेनर ट्रेन सेवेचा शुभारंभ केला. ड्वार्फ कंटेनर ट्रेन सेवा ही आयात-निर्यात मालाची रेल्वे वाहतूक सुव्यवस्थित करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही सेवा सुरू झाल्याने अंतर्देशीय वाहतूक खर्च कमी होवून आयात-निर्यात समुदाय स्पर्धात्मक दराने आपल्या मालाची वाहतूक करू शकतात. यासोबतच जेएनपीटीमध्ये रेल्वे-मालवाहतूकीमध्ये सुद्धा वाढ होईल. त्याचप्रमाणे, तंत्राज्ञानाच्या आघाडीवर विविध उपाय योजने अंतर्गत आम्ही एनएसआयसीटी आणि एपीएमटी येथे दोन मोबाईल एक्स-रे स्कॅनर बसवले आहेत ज्यामुळे संशयास्पद कंटेनर बंदरा बाहेर जाण्याअगोदरच सुरक्षा एजन्सीं योग्य कारवाई करू शकतील व पर्यायाने आमच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. प्रत्येक टर्मिनलसाठी स्वतंत्र स्कॅनर उपलब्ध झाल्यामुळे इम्पोर्ट ड्वेल टाईम सुद्धा लक्षणीरित्या कमी होईल.
जेएनपीटी सागरी व्यापार व वाहतूक क्षेत्रात नवनवीन कल्पना आमलात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून भारताच्या विकास यात्रेस गति देण्यासाठी सातत्याने विकासाचे नवनवीन मार्ग निर्माण करीत आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या कोस्टल बर्थमुळे किनारपट्टीवरील मालवाहतुकीस चालना मिळेल आणि किनारपट्टीवरील जहाजवाहतुकीसाठी उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध होईल. किनारपट्टीवरील मालवाहतुकीसाठी कोस्टल बर्थची सुविधा उपलब्ध झाल्याने रेल्वे वे रस्ते मार्गावरील वाहतूकीचा ताण कमी होवून एक किफायतशीर व प्रभावी मल्टी-मोडल वाहतूक पर्याय उपलब्ध झाला आहे. या व्यतिरिक्त, जेएनपीटीने बंदर आधारित औद्योगिकीकरणास चालना देण्यासाठी जेएनपीटी-सेझमधील 9 भूखंडांच्या यशस्वी बोलीदारांना आशयपत्र प्रदान केले आहे. भारताला ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनवण्याच्या उद्देशाने आघाडीच्या जागतिक कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी जेएनपीटीने आपल्या एसईझेडमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. केंद्रीय पार्किंग प्लाझा (सीपीपी) च्या कामकाजाची व पुरवठा साखळीसाठी आवश्यक रिअल-टाइम माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही जेएनपी-सीपीपी अॅप सुद्धा सुरू केले आहे.
जेएनपीटीने आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी व कामगिरीमध्ये सुधारणा करण्यासाठी सतत नावीन्यपूर्ण उपाययोजना करून जगभरातील ग्राहकांच्या मनामध्ये विश्वासार्हतेची भावना निर्माण केली आहे तसेच कुशल व्यापाराची हमी दिली आहे. या सर्व बाबींच्या आधारावरच आम्ही सागरी वाहतूक क्षेत्रातील व्यापार वर्गाचे पहिल्या पसंतीचे बंदर बनलो आहोत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *