ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

एकसंघ सेवा सातत्य टिकून रहावे :लॉ. सुभाष देवी दान

June 29, 202112:04 PM 34 0 0

जालना ( प्रतिनिधी) : जालन्यात लायन्स क्लबच्या स्थापनेपासून विविध क्लबमध्ये विभागलेल्या सदस्यांना एकत्रित आनत आपण जालना लॉयन्स परिवार ही संकल्पना रुजवली असून एक संघपणे असलेले सेवा सातत्य यापुढेही कायम टिकून रहावे. अशी अपेक्षा जालना लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य तथा अ. भा. मारवाडी संमेलन चे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष लॉ. सुभाष चंद्र देवीदान यांनी व्यक्त केली .तथापि आपण शेवटपर्यंत समाजकार्यात सक्रिय राहणार असल्याची ग्वाही देखील देवीदान यांनी सत्कार सोहळ्या प्रसंगी दिली.

राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या अ. भा. मारवाडी संमेलन जालना शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी समर्पण व सेवाभावी वृत्तीने कार्यरत असलेले सुभाषचंद्र देवीदान यांची नुकतीच निवड करण्यात आली.या निवडीबद्दल त्यांचा जालना लॉयन्स परिवाराच्यावतीने फटाक्यांच्या आतिषबाजीत सपत्नीक भव्य- दिव्य असा जंगी सत्कार करण्यात आला. मधुर बँक्वेट हॉल येथे लॉ. विनोद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्कार सोहळ्यास लायन्स क्लब चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एम. जे. एफ . लॉ.विवेक अभ्यंकर, लॉयन्स क्लब चे प्रथम उपप्रांतपाल लॉ. पुरुषोत्तम जयपुरिया, माजी प्रांतपाल विजयकुमार बगडिया, अतुल लढ्ढा, अरुण मित्तल, शाम लोया, रामकुँवर अग्रवाल, पारसमल देसरडा, सौ. कमल देवीदान, सौ. स्मिता मित्तल,मिनाक्षी दाड, यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्कारास उत्तर देतांना सुभाषचंद्र देवीदान पुढे म्हणाले, लॉयन्स क्लब च्या सेवा कार्यासाठी सदस्य वाढ या वर भर दिला. आपल्या आवाहनास प्रतिसाद देत विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत मान्यवर लॉयन्स च्या सेवा कार्यात जोडले गेले. असे सांगून सुभाषचंद्र देवीदान सदस्य संख्या वाढत गेल्यावर तेरा क्लब मध्ये जालना लॉयन्स चा विस्तार झाला. या तून वेगवेगळ्या प्रकारे समाजकार्य करण्यास अधिक भर पडली. असे देवीदान यांनी नमूद केले.


वेगवेगळ्या पातळीवर तेरा क्लब असले तरी यांना विभागनी न होऊ देता परिवाराची रचना करण्यास सर्व सदस्यांनी सहकार्य केले असून आपल्या एका शब्दावर सर्व क्लब चे सदस्य आजही तत्पर असतात. ही लॉयन्स च्या इतिहासात फार मोठी उपलब्धता असल्याचे सांगून सेवा कार्याचा हा यज्ञ या पुढे ही सदोदित रहावा, आपण सुरू केलेला वारसा तसेच या सेवा यज्ञात आपल्या परीने समीधा अर्पण करत राहणार असल्याची ग्वाही सुभाषचंद्र देवीदान यांनी दिली.
उपप्रांतपाल लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया यांनी सत्कार सोहळ्याची भूमिका विषद करतांना अग्रवाल समाजासोबतच व्यापारी महासंघ, रेल्वे समिती,सांस्कृतिक, शिक्षण, सहकार अशा सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याने वेगळा ठसा निर्माण करणारे जालना लॉयन्स परिवाराचे जेष्ठ व संस्थापक, कर्मठ समाजसेवक सुभाषचंद्र देवीदान यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन त्यांची मारवाडी संमेलन जालना शाखेच्या जिल्हाध्यक्ष पदी झालेली निवड ही परिवारासाठी भूषणावह बाब असल्याने सर्व सदस्यांकडून कौटुंबिक सत्कार सोहळा आयोजित केल्याचे पुरूषोत्तम जयपुरिया यांनी स्पष्ट केले.
गेली पंचावन्न वर्षांपासून समाज सेवेत अग्रेसर असलेल्या सुभाषचंद्र देवीदान यांनी छञपती शिवाजी महाराज जयंती,सर्वात प्राचीन अशा हत्ती रिसाला समित्यांची अध्यक्ष पदे भूषविली, जालना मर्चंट्स बँकेचे संचालक, व्यापारी महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पदावर काम करतांना व्यापारी बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते अग्रेसर राहतात. पन्नास वर्षे जुन्या शालेय मिञांना संघटीत करून माजी विद्यार्थी संघटना निर्माण केली. अग्रवाल परिचय संमेलन,अग्र महाकुंभ,या उपक्रमांत त्यांचे महत्वपूर्ण योगदान दिले असून बायोडाटा बँक उभारणीत सुभाषचंद्र देवीदान यांचा सिंहाचा वाटा आहे.असे सांगून पुरूषोत्तम जयपुरिया यांनी सर्व क्षेत्रातील समस्यांची जाण, त्या सोडविण्याचे कौशल्य अवगत असलेल्या सुभाषचंद्र देवीदान यांच्या निवडीने सकल मारवाडी समाज बांधवांत चैतन्य संचारले असून जिल्हाध्यक्ष पदास त्यांच्या मुळे झळाळी प्राप्त झाली असल्याचे पुरूषोत्तम जयपुरिया यांनी नमूद केले.
सत्कार सोहळ्यास धर्मेंद्र कुमावत, विजय दाड, द्वारकादास मुंदडा, एम. पी. पवार, सतीश संचेती, मुरारीलाल गुप्ता, मोहन इंगळे, राधेश्याम टिबडेवाल, अशोक हुरगट, जगदीश अग्रवाल, हनुमान प्रसाद भारूका, अनुज बगडिया, सौरभ पंच, राकेश नहार, राजेंद्र बजाज, प्रकाश लढ्ढा,किरण खरात, दिलीप शाह, शरद जैस्वाल, पुष्पा अग्रवाल, कृष्णा देवीदान यांच्या सह लॉयन्स परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. सुञसंचालन सौ. स्मिता मित्तल यांनी केले तर शाम लोया यांनी आभार मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *