जालना ( प्रतिनिधी) : कोरोना महामारी मुळे टाळे बंदीचे संकट असतानाही सेवा हाच धर्म मानून जालना लॉयन्स परिवारातील विविध क्लबच्या माध्यमातून 18000 सेवा प्रकल्प कार्यान्वित राहिले . या बळावर च गतवर्षाचा प्रवास सुंदर झाला असून डिस्ट्रिक्ट मध्ये लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया यांच्या नेतृत्वाखाली जालना लॉयन्स परिवाराचे सेवा कार्य अग्रभागी राहिले. असे गौरवोद्गार लॉयन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एम. जे. एफ.लॉ.विवेक अभ्यंकर यांनी आज येथे बोलताना काढले.
लॉयन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल च्या एम.सी .सी. पदावर विजयी झाल्यानंतर वर्षभरातील डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांचा जालना लॉयन्स परिवारातील विविध क्लबच्या सदस्यांना अधिकृत भेट सोहळा लॉ. विनोद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता .25) मधुर बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला. या सोहळ्यात लॉ. अभ्यंकर बोलत होते. यावेळी लॉयन्स चे प्रथम उपप्रांतपाल लॉ. पुरुषोत्तम जयपुरिया, माजी प्रांतपाल तथा जालना लॉयन्स क्लब चे अध्यक्ष लॉ. विजयकुमार बगडिया, लॉ सुभाष देवीदान ,लॉ.अतुल लढ्ढा, लॉ.अरुण मित्तल, लॉ.श्याम लोया, लॉ.रामकुॅवर अग्रवाल , लॉ.जितेंद्र महाजन,यांची प्रमुख उपस्थिती होती.
\
https://indianfast.com/
लॉ. विवेक अभ्यंकर पुढे म्हणाले, लॉयन्स क्लब च्या इतिहासात जालना लॉयन्स अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध क्लबनी जालना लॉयन्स परिवार ही नवसंस्कृती निर्माण केली. असे सांगून वर्षाच्या सुरुवातीपासून लॉ. पुरुषोत्तम जयपुरिया यांच्या नेतृत्वाखाली जालना लॉयन्स परिवार चार डिस्ट्रिक्ट च नव्हे तर पूर्ण भारतात सेवा कार्यात सर्वोच्च स्थानी राहिला आहे. असे लॉ. विवेक अभ्यंकर यांनी नमूद केले. परिवार एकसंघ पाठीशी असल्याने लॉ. पुरुषोत्तम जयपुरिया यांना मोठ्या पदावर कार्य करण्याची संधी पुन्हा लाभली असून ते आणखी मोठ्या पदावर जातील. असा विश्वास व्यक्त करून आपण जालना लॉयन्स परिवाराच्या विविध सेवा प्रकल्पांशी कायमस्वरूपी बांधिल राहणार असल्याची ग्वाही लॉ.विवेक अभ्यंकर यांनी शेवटी दिली.
लॉ.अतुल लढ्ढा यांनी डिस्ट्रिक्ट ३२३४ एच २ मधील 17 हजार 934 कार्यान्वित असलेल्या सेवा प्रकल्पां च्या कार्य अहवाला विषयी माहिती देऊन 81 क्लबच्या माध्यमातून 3,200 सदस्यांनी वेळ दिला त्यामुळे ५१ लाख गरजूंना मदत दिली असून जालना परिवारातील तेरा क्लब च्या विविध सेवा प्रकल्पांचा १ लाख ८२ हजार व्यक्तींना लाभ मिळाला असल्याचे सांगितले.या वर्षात दीड हजार व्यक्तींवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून २० हजारांच्यावर नेत्रतपासणी तसेच बाराशे व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आल्याची माहिती अतुल लढ्ढा यांनी दिली.
लॉ. विजयकुमार बगडिया यांनी स्वागत मनोगतात राज्यात एकमेव जालना परिवारातील सदस्य पुरुषोत्तम जयपुरिया यांच्या पाठीशी राहिले आहेत क्लबने सदस्य वाढीवर भर दिल्याचे त्यांनी सांगितले.
लॉ. रामकुँवर अग्रवाल यांनी शासकीय रुग्णालयांत दररोज 80 व्यक्तींना भोजनाची व्यवस्था केली जात असून आतापर्यंत बाराशे व्यक्तींचे मोफत डायलिसिस करण्यात आल्याची माहिती दिली.
लॉ. धर्मेंद्र कुमावत यांनी राष्ट्रध्वजाचे महत्त्व विषद केले. यावेळी विवेक अभ्यंकर यांचा सर्व क्लबच्या सदस्यांतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. सौ. स्मिता मित्तल व सौ. मीनाक्षी दाड यांनी सूत्रसंचालन केले तर लॉ. श्याम लोया यांनी आभार मानले.या सोहळ्याचे औचित्य साधून नवीन प्रतिष्ठीत सदस्यांचा समावेश करण्यात आला सोहळ्यास लॉ. एम.पी.पवार, विजय दाड, मुरारीलाल गुप्ता, द्वारकादास मुंदडा, सतीश संचेती, राजेश खिस्ते, संतोष दुधानी, मोहन इंगळे, राधेश्याम टिबडेवाल, अशोक हुरगट, जगदीश अग्रवाल,हनुमान प्रसाद भारूका ,रामदेव श्रोत्रिय , किरण खरात,अनुज बगडिया, सौरभ पंच, शरद जयस्वाल, प्रकाश लढ्ढा,राकेश नहार,राजेंद्र बजाज, दिलीप शाह, कमल देवीदान, पुष्पा अग्रवाल, कृष्णा देवीदान यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.
सुवर्ण अक्षरात नोंद : लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया
संकट काळात जालना लॉयन्स परिवाराने सुरू ठेवलेल्या सेवा कार्याची लॉयन्स च्या अंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण अक्षरात नोंद राहिल. असा विश्वास लॉयन्स चे प्रथम उपप्रांतपाल लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया यांनी या वेळी व्यक्त केला. डिस्ट्रिक्ट गव्हर्नरांची वर्षाअखेरीस भेट असून अवघ्या चोवीस तासांत हा सर्व योग जुळून आल्याचे पुरुषोत्तम जयपुरिया यांनी नमूद केले. तथापि आपण प्रथम उपप्रांतपाल पदावर आल्याने सेवा कार्याची जवाबदारी अधिक वाढली असल्याचे ही जयपुरिया यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply