ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे संततधार कार्यक्रम संपन्न

July 6, 202212:47 PM 15 0 0

उरण( संगिता पवार ) : सर्वांच्या सुख -समृद्धी करिता व कल्याणार्थ ब्राम्हण सभा उरण यांच्या तर्फे श्री गणपतीवर अखंड २४ तास संततधारआणि २४ तास अथर्वशीर्ष पठाण कार्यक्रम गणपती चौक गणपती मंदिर संपन्न झाला .सदर कार्यक्रमाची सुरुवात पूजेच्या संकल्पा सहित श्री संजय रवींद्र केळकर गुरुजी रेवदंडा यांनी श्री सिद्धेश पुरुषोत्तम पांडे यांच्या हस्ते करण्यात आली . अध्यक्ष ब्राम्हण सभा उरण व अध्यक्षा महिला मंडळ ब्राम्हण सभा आयोजित करण्यात आले होते .
प्रती वर्षी प्रमाणे श्री गणपतीवर अखंड २४ तास संततधार वअथर्वशीर्ष पठण कार्यक्रम शनिवार ( दि. २ ) जुलै रोजी सकाळी ६ वाजल्या पासून रविवार ( दि. ३ ) जुलै सकाळी ६ वाजे पर्यंत संपन्न झाला ..
या वेळी कार्यक्रमास हनुमंत वासुदेव ( आर्य ),वैभव राईलकर , हेमंत धामणकर, प्रभाकर दाते ,धनंजय उपाध्ये ,चंद्रकांत दांडेकर ,श्रीधर मोहळकर , नरेंद्र उपाध्ये ,विराम उपाध्ये ,हरिश्चंद्र जुवेकर ,चंद्रकांत साठे ,नितीन भानजी , ब्राम्हण सभा उरण अध्यक्ष ,सदस्य ,ब्राम्हण सभा महिला शाखा व सदस्या यांचे सहकार्य लाभले .

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *