मागील दोन वर्षापासून सर्व जगाला कोरोना या आजाराने ग्रासले आहे.सर्वसामान्यांच्या मनात दोन वर्ष झाली तरी आजही या बद्दल भीती ,गैरसमज ,चुकीच्या कल्पना तयार झालेले आहेत .त्याविषयीच्या समज गैरसमज आपण आता बघू द्या.
सर्दी ,खोकला ,ताप आला की रुग्ण हॉस्पिटलमध्ये येतच नाही तर तोघरच्याघरी औषध गोळ्या घेतो. परिणामी चुकीचे औषध चुकीचे डोस घेतल्याने आजार बरा होतच नाही उलट अजून गंभीर ( complicated) होतो म्हणून सर्वात महत्त्वाचे की सर्दी खोकला झाला ताप आला की आधी आवश्यक तपासण्या करून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कोरोना होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावयाची याची भारतभर मोहीम चालू आहे. सरकार मार्गदर्शन करत आहे त्याचे समाज पालन करत नाही तर तो आजारहा होणारच. सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपली चुकीची जीवनशैली अयोग्य व असमतोल आहार आणि तणाव ,चिंता तसेच सर्वांच्या पेक्षा पुढे जाण्याची जीवघेणी शर्यत या सर्व गोष्टींमुळे माणसाची झोप पूर्ण होत नाही नकारात्मकता येते , योग्य विचार सुचत नाही परिणामी शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते.लाखो प्रकारचे जंतू वातावरणात असतात त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत नाही कारण आपली प्रतिकारशक्ती चांगली असते .जर ती कमी झाली तर त्यांनी खोकल्यासारखे साधे वाटणारे आजार देखील पटकन होतात. ज्यांची प्रतिकारशक्ती कमजोर त्यांना कोरोनासारखा आजार होतो.
बरं आजार झाल्यावर त्यावर योग्य तपासण्या योग्य उपचार केले जात नाही . कोरोना मुळे रुग्णांना श्वास घेता येत नाही त्यामुळे रुग्ण अजून घाबरतो .त्याचा संपर्क इतरांना होऊ नये म्हणून विलगीकरण कक्षामध्ये ( isolation ward) त्याला ठेवण्याचा सांगितलं जाते आपण या गोष्टी कडे किती सकारात्मकतेने पाहतो हे खूप महत्त्वाचे आहे.
१७ ते २१ दिवस अलगी करण कक्षात रुग्णाला एकटे राहावे लागते . मनुष्य सामाजिक प्राणी आहे जन्मल्यापासुन तो सतत कोणाच्या तरी संपर्कात असतो आणि तसे त्याला आवडते. इथे त्याला एकटे राहावे लागते त्यात आजारी असल्याकारणाने अजून सोबतीची गरज लागते … आणि मग नैराश्य येणे, चिडचिड होणे, करमत नसणे अश्या गोष्टी होतात .भीती वाटते आता मी काही जिवंत राहणार नाही असे वाटणे त्यामुळे आत्महत्येचे प्रकार घडतात . त्यासाठी काय करायला पाहिजे स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे .ऑफिस, घर, कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या पार करताना आपण कधीच विचार करत नाही. या काळात सकाळी लवकर उठणे ,जमेल तेवढा व्यायाम करणे ,पेपर वाचणे, संगीत ऐकणे, वेळेवर औषधे घेणे, पौष्टिक नाश्ता जेवण घेणे, मनाला सुचेल ते लिहिणे, वाचन करणे, स्वतःचा मनोबल वाढवणारे आणि सकारात्मक राहायला शिकवणाऱ्या आपल्या भगवंताचे नामस्मरण करणे, पौराणिक कथा वाचणे या गोष्टी कराव्यात.भगवत गीता ,दासबोध वाचुन आपल्याला आनंदी राहण्याचे खरे मार्गदर्शन मिळते .मला माझ्या एका परिचिताने एक ग्रंथ वाचण्यास दिला आनंदी जीवनाचे रहस्य असलेला ग्रंथ म्हणजे “गीता ज्ञान दर्शन ” .खूप सुंदर ग्रंथ आहे, सध्याच्या ताण-तणावाच्या जीवनात कोरोना परिस्थिती अत्यंत उपयुक्त माहिती असलेला असा ग्रंथ वाटला.
Dr संगीता जाधव
होमिओपॅथिक तज्ञ
संभाजी नग़र
Leave a Reply