ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोरोना बिलांची ऑडिट समिती कागदावरच ; खासगी रुग्णालयांच्या मनमानीस चाप लावावा शुभम टेकाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

April 27, 202113:17 PM 45 0 0

जालना ( प्रतिनिधी) : कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी दिलेल्या बिलांचे ऑडिट करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रत्येक रुग्णालयात नेमलेली ऑडिट समिती कागदावरच असल्याचा प्रत्यय जनतेला येत असून खासगी रुग्णालयांकडून रूग्णांची सर्रास पिळवणूक सुरू आहे. राज्य शासनाने यावर कटाक्षाने लक्ष देऊन खासगी रुग्णालयांच्या मनमानीस चाप लावावा .अशी आग्रही मागणी मराठा महासंघाचे युवा सामाजिक कार्यकर्ते शुभम टेकाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

या संदर्भात गुरुवारी ( ता. २२) जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या लेखी निवेदनात शुभम टेकाळे यांनी म्हटले आहे की, गतवर्षी प्रमाणे यंदा उदभवलेली कोरोना संसर्गाची दुसरी लाट तसेच लॉकडाऊन मुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा स्थितीत पुन्हा कोरोना चा विळखा वाढल्याने जनता भयभीत झाली असतांना खाजगी रुग्णालयांकडून याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे शुभम टेकाळे यांनी नमूद केले. पाच ते दहा हजार रुपये खोली भाडे, तसेच उपचारासाठी भरमसाठ बिले खाजगी रुग्णालयांमार्फत आकारली जात आहेत. बिलांवरून रूग्णालय व्यवस्थापन आणि रूग्णांचे नातेवाईक यांच्यात वाद घडत आहेत. विशेष म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मार्गदर्शक तत्त्वे, नियम धाब्यावर बसवले जात असून हे प्रकार थांबविण्यासाठी राज्य शासनाने वेळीच उपाय योजना करून वाढीव बिल वसूल करणाऱ्या खाजगी रुग्णालयांची मान्यता तात्काळ रद्द करावी. अशी मागणी लेखी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर शुभम टेकाळे, पृथ्वीराज भुतेकर, अशोक पडूळ, मंगेश कापसे, पृथ्वीराज मोरे, संतोष कऱ्हाळे, आकाश जगताप, राम साळुंके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *