ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोरोनामुळे दहा दिवसांचे श्रामणेर प्रशिक्षण शिबिर रद्द

April 15, 202116:16 PM 10 0 0

नांदेड – तालुक्यातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खुरगाव नांदुसा संचलित श्रामणेर प्रशिक्षण व विपश्यना केंद्र खुरगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीपर्व साजरे करण्यात येणार होते. १७ एप्रिलपासून विशेष श्रामणेर शिबिरास प्रारंभ होऊन चैत्र पौर्णिमा २७ एप्रिल रोजी पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खुरगाव येथील सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.

महामानव बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीपर्वानिमित्त श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे दहा दिवसांचे विशेष श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीही कोरोनामुळे बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात मर्यादा येत होत्या. परंतु जिल्ह्यासह परिसरातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. त्यामुळे कोणतेही कार्यक्रम घेतले जाणार नाहीत. खुरगावकडे येणाऱ्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी याची नोंद घ्यावी असे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *