ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

करोना महामारीत आ. कैलास गोरंट्याल यांचे कार्य कौतुकास्पद: राजाभाऊ देशमुख

April 10, 202113:44 PM 123 0 0

जालना (प्रतिनिधी) ः करोनाच्या महामारीत मागील वर्षभरापासून संकटात असलेल्या गोर-गरीब कुटूंबीयांना अन्नधान्य वाटप करण्याबरोबरच स्थलांतरीत कामगार व मजुरांना अन्नदानाचे वाटप करून खऱ्या अर्थाने करोना योद्धा ठरलेले जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांचे व त्यांच्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी आज येथे बोलतांना केले. महाराष्ट्र विधीमंडळ आश्‍वासन समितीचे प्रमुख तथा प्रदेश कॉग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त जालना शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने आज शुक्रवारी सकाळी शहरातील गांधी चमन येथील जिल्हा महिला व बाल रूग्णालयात आयोजीत करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. या शिबीराचे उद्घाटन आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक जालना शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, न. प. गटनेते गणेश राऊत, जिल्हा महिला व बाल रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राम सावंत, जालना तालुकाध्यक्ष वसंत जाधव, डॉ. विशाल धानुरे, नगरसेवक अरूण मगरे, किशोर गरदास, शेख शकील, धर्मा खिल्लारे, सय्यद करीम मनिष जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना श्री देशमुख म्हणाले की, आ. कैलास गोरंट्याल संकटाच्या काळात धावून येणारा नेता असल्याचे जिल्हा नव्हे तर संपुर्ण मराठवाडा विभागात नावलौकीकता आहे. गेल्या वर्र्षी करोना महामारीचे संकट निर्माण झालेले असतांना जालना शहरातील आणि जिल्ह्यातील हजारो कामगार व कष्टकऱ्यांचा रोजगार बुडाला होता. शिवाय हातावर मजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या मजुरांचे अन्न पाण्यावाचून मोठे हाल झाले होते. ही बाब लक्षात घेवून आ. गोरंट्याल यांनी जालना शहरातील हजारो कुटूंबांना अन्नधान्य घरपोच वाटप करून तसेच लॉकडाऊनमुळे अन्य राज्य व जिल्ह्यातील स्थलांतरीत कामगार, मजुर आणि त्यांच्या कुटूंबीयांना मातोश्री कै. भुदेवी किसनराव गोरंट्याल प्रतिष्ठाणच्या माध्यमातून दररोज अन्नदान करून विस्तापितांना मोठा दिलासा देण्याचा उपक्रम राबवला होता. सामाजिक कार्यात गोरंट्याल परिवाराचे नेहमीच मोठे योगदान राहिलेले आहे. स्व. किसनराव गोरंटयाल, स्व. भुदेवी गोरंट्याल यांच्या सामाजिक कार्याचा वारसा आ. कैलास गोरंट्याल यांनी पुढे देखील सुरू ठेवला असून त्याचाच एक भाग म्हणून वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर, रूग्णांना फळवाटप, अन्नदान तसेच करोना महामारीला रोखण्यासाठी सॅनिटायझर, मास्क वाटप इत्यादी सामाजिक उपक्रम राबवून आ. गोरंट्याल व त्यांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम केले असल्याचे उद्गार श्री देशमुख यांनी यावेळी काढले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य संयोजक शहर काँग्रेस कमिटचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा महिला व बाल रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी चंद्रकांत रत्नपारखे, मोहन इंगळे, आनंद लोखंडे, युवराज राठोड, कृष्णा पडोळ, नगरसेवक महाविर ढक्का, रमेश गौरक्षक, जीवन सले, विनोद रत्नपारखे, सय्यद अजहर, विष्णू वाघमारे, अफसर चौधरी, सय्यद मुस्ताक, फकीरा वाघ, शिवप्रसाद चितळकर, जावेद अली, गणेश चौधरी, अशोक नावकर, मनोज गुडेकर, अरूण घडलिंग, नितिन कानडे, अशोक उबाळे, राजेंद्र गोरे, महेंद्र मघाडे, नंदा पवार, मंगल खांडेभराड, रहिम तांबोळी, शेख शमशोद्दीन, सोपान सपकाळ, गणेश चांदोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्र संचालन शहर कॉग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी केले तर आभार मोहन इंगळे यांनी मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *