जालना: कोरोना विषाणू पासून गावातील प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी जालना तालुक्यातील पिरकल्याण
ग्रामपंचायतीने आमदार कैलास गोरंटयाल यांच्या मदतीने गावामध्ये कोरोना प्रतिबंध लसीकरण शिबिराच आयोजन केले होते.शिबिरामध्ये २०० नागरिकांनी कोरोना प्रतिबंध लस घेतली .
• पिरकल्याण येथील लसीकरण शिबिरात 200 नागरिकांनी कोरोनाची लस घेतली.
• 45 वर्षापुढील नागरिकांना ही लस देण्यात आली
आरोग्य अधिकारी दिनेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे लसीकरण केले. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी या शिबिरात सहभाग घेऊन लस घेतली. या लसीकरन माहीमेचे उदघाटन आमदार कैलास गोरंटयाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच आजम शेख ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि आरोग्य कर्मचारी यांची उपस्थिती होती शिबिरासाठी दत्ता पाटील शिंदे, नारायण शिंदे, आजम शेख,सुरेश वाघमारे, रोशन खा पठाण ,प्रमोद वाघमारे विठ्ठल शिंदे,बाळू शिंदे, करन शिंदे यांनी परीश्रम घेतले यावेळी सरपंच तसेच गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मानेगावचे आरोग्य अधिकारी,डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी श्रीमती माने. श्रीमती निर्मळ. श्रीमगर साहेब. श्री पाटील , आशा वर्कर आणि अंगणवाडी कार्यकत्या इ आभार मानले.
Leave a Reply