ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोरोनाच्या निर्बंधामुळे व्यावसायिक अडचणीत ग्रामीण भागात बेरोजगारी वाढली

March 20, 202115:09 PM 137 0 0

जालना (प्रतिनिधी) भारतीय संस्कृतीत लग्न म्हणजे आयुष्याची सुरुवात! मात्र त्यावरही कोरोनाने महाभयंकर असं संकट आणलं आहे. विवाह सोहळा म्हणलं म्हणजे त्यात वधू-वराला लग्नासाठी लागणारे मंडप सजावट, मंगल कार्यालय, फुलांचे हार, वराती साठी लागणारा घोडा, लग्न वर्‍हाडी साठी लागणारे वाहन- गाड्या, फोटो, इतर सर्व काही या सर्वांना कोरनामुळे बेरोजगारीचे सावट पसरल्याचे दिसून येत आहे.

अनलॉकनंतर आता कुठे सर्वच व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत होते. मात्र पुन्हा कोरोणाचे संकट घोंगावत आहे यामुळे सुरू झालेले व्यवहार- उद्योग पूर्ण बंद करावे लागतात की काय अशी परिस्थिती दिसून येत आहे. अगोदरच लग्नकार्य धार्मिक सोहळे यासह इतर अनेक धार्मिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आल्याने याशी निगडीत सर्व व्यवसायावर संकट आले आहे.आता परत एकदा घातलेल्या मर्यादेमुळे पुन्हा हे व्यवसाय अडचणीत आले असून यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेने सर्वांना घेरले आहे तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लग्न सोहळा हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे या सोहळ्यात माणूस कोणतीही तडजोड करत नाही. आयुष्यात लग्न एकदाच होते त्यामुळे ते धुम धडाक्यात व्हावे अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते. अलीकडे लग्न ही घरासमोर न करता लॉन्स किंवा मंगल कार्यालयात केले जातात त्या ठिकाणी सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळतात तसेच कुटुंबातील व्यक्तींची धावपळ होत नाही म्हणून लॉन्स निवडले जातात. लॉन्सचा मालक वाद्य, जेवण, मिरवणुकीसाठी आवश्यक असणारा घोडा, मंत्रघोष करणारा पुजारी, जेवणाची सर्व सोय, पाहुण्यांची देखभाल करणारे केटरर्स, हार पुष्पगुच्छ, छायाचित्रकार, आर्केस्ट्रा सर्व एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे सर्वात जास्त ओढ लॉन्सवर लग्न करण्याकडे असते. एका लग्नावर जवळपास दहा व्यवसाय अवलंबून असतात त्यामुळे त्याचे कुटुंब आणि आर्थिक बजेट सर्व याच व्यवसायावर अवलंबून असते शिवाय लॉन्स मालकाला विविध प्रकारचे सरकारी कर भरावे लागतात यंदा मात्र जवळपास एक वर्षे लग्नसोहळे बंद होते. यादरम्यान अनेकांनी घरापुढे चार पाहुण्यांचे उपस्थित लग्न लावले परंतु आता कुठे नंतर या विवाह सोहळ्यांना परवानगी मिळाली तीसुद्धा अनेक अटींवर यामुळे पूर्वीसारखी थाटामाटाचे दिवस आता नाही.कोरोना संकट आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा गर्दी टाळण्यासाठी लग्न सोहळा अवघ्या पन्नास माणसांच्या उपस्थितीत करण्याचे आवाहन प्रशासनाने केले लग्नसोहळे थोडक्या माणसात साजरी करण्याचे फर्मान काढल्यामुळे अनेक व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या सर्वत्र लग्नसोहळे सुरू आहेत. लग्न असले तरी एका सोहळ्यावर अनेक व्यवसाय अवलंबून असतात त्यामुळे लग्न समारंभ साजरे करण्यासाठी नियमांचे कठोर पालन करून सुरू ठेवण्याची मागणी व्यवसायिक करत आहे.

माझ्या व्यवसायावर सात ते नऊ मजूर लोक अवलंबून असतात त्यांचा रोजगार बंद झाला आहे सत्तर ते ऐंशी टक्के निश्चित झालेले विवाह सोहळ्याच्या तारखा रद्द झाल्या व जे 20% विवाह बाकी आहे ते पण कोरोनाचे नियम पाळून करावे लागतात त्यामध्ये वाढेकरी, बँडवाले, लाईट बिल ,साफ सफाई कामगार यांचा पगार होत नाही आणि इतर बँकेचे घेतलेले लोन कर्ज कसे फेडावे त्यामुळे यामध्ये निर्बंध कमी करून जास्त लोकांमध्ये लग्न करा करण्याची सवलत आम्हाला द्यावी.
सौ.सरिता खरात संचालिका त्र्यंबक लीला मंगल कार्यालय जांभोरा

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *