जालना:- जालना येथे आज दुस-या टप्प्यामध्ये फ्रंट लाईन वर्करचे लसीकरण सुरु करण्यात आले यामध्ये जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक, विनायक देशमुख तसेच त्यांच्या विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात यांनी आज रोजी कोरोनावरील लस टोचुन घेतली. त्यानंतर सर्वांना अर्धा तास निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. संजय जगताप, डॉ. संतोष कडले आदींची उपस्थिती होती.
आज जिल्हाधिका-यांबरोबर अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, प्रभारी उपअधिक्षक (गृह) शालिनी नाईक, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव एपीआय शिवाजी नागवे यांच्यासह महसुल व पोलीस विभागातील अधिकारी कर्मचा-यांनी लस टोचुन घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, लस पुर्णत: सुरक्षित असुन दुस-या टप्प्यामध्ये फ्रंट लाईन वर्करचे लसीकरणसाठी नोंदणी झाली आहे यामध्ये महसुल कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, नगर परिषदेच्या कर्मचा-यांची नोंदणी झाली आहे. सर्वांना आवाहन करतो की, लस पुर्णत: सुरक्षित आहे. सर्वांनी लस टोचुन घ्यावी.
Leave a Reply