उरण नगर परिषद मध्ये करवसुली विभागात काम करणारे लिपिक पदावर काम करणारे नरेंद्र रामजी यांना उरण नगर परिषदेच्या वतीने कोरोना योद्धा मानून सन्मानपत्र आमदार महेश बालदी यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी , भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर , शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील , रायगड जिल्हा अल्पसंख्याकअध्यक्ष जसिम गॅस आदि उपस्थित होते तसेच . मुख्याधिकारी संतोष माळी यांनीही नरेंद्र उभारे यांचे आभिनंदन केले.
नरेंद्र उभारे यांनी 23 मार्च 2020 पासुन ते आजपर्यंत कोरोना संकट काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी सेवा देऊन मानवतेचे काम केले आहे.
Leave a Reply