ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या हुतात्मा स्मृति दिनावर कोरोनाचे सावट

September 18, 202114:00 PM 16 0 0

उरण ( संगिता पवार ) उरण तालुक्यातील चिरनेर येथील चिरनेर जंगल सत्याग्रहाचा हुतात्मा स्मृती दिन साजरा करण्या संदर्भात नुकतीच चिरनेर ग्रामपंचायत कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली सदर बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच संतोष चिर्लेकर यांनी भुषविले होते दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 91वा स्मृतिदिन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला 1930च्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या हेतूने चिरनेर येथील हुतात्मा स्मृतीस्तंभ समोर दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शासकीय मानवंदना म्हणून चिरनेर ग्रामपंचायत प्रशासन, उरण पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषद आणि नवी मुंबई पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते परंतु यावर्षी चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या 91 व्या हुतात्मा स्मृती दिन कार्यक्रमावर कोरण्याचे सावट असल्याचे दिसून येत आहे.

महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली त्या चळवळीला पाठिंबा देत उरण मधील शेतकऱ्यांनीही आपल्या जीवाची पर्वा न करता सत्याग्रह करून इंग्रजांप्रती आपला रोष व्यक्त केला होता या वेळी इंग्रजांनी केलेल्या गोळीबारामुळे व मारहाणीमुळे अनेक जण अपंग झाले तर धाकू गवत्या फोफेरकर नाग्या महादू कातकरी रघुनाथ मोरेश्वर न्हावी रामा बामा कोळी परशुराम रामा पाटील हसराम बुधाजी घरत आनंदा माया पाटील आलु बेंबट्या म्हात्रे या शूर वीरांना जीव गमवावा लागला आणि ते हुतात्मे झाले अशा हुतात्मा झालेल्या शूर वीरांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या उद्देशाने चिरनेर येथील हुतात्मा स्मृतीस्तंभ समोर दरवर्षी 25 सप्टेंबरला चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या स्मृती दिन कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना शासकीय मानवंदना म्हणून आयोजन करण्यात येते परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिरनेर जंगल सत्याग्रहचा 91 वा स्मृती दिन कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला या वेळी रा जी प चे सदस्य बाजीराव परदेशी उरणच्या सभापती शुभांगी पाटील शेकापचे चिटणीस सुरेश पाटील पोलिस पाटील संजय पाटील ग्रामपंचायतींच्या सदस्या सविता केणी शितल घबाडी संध्या ठाकूर ग्रामविकास अधिकारी महेश पवार ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश फोफेरकर किरण कुंभार धनेश ठाकूर प्रतीमा मोकल सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *