नांदेड(प्रतिनिधी)- सर्व सामान्य नागरीकांना दोन-तीन दिवसा आड पाण्याचा पुरवठा होत असतांना शहरातील वजिराबाद भागात एका नळ वाहिणीतून हजारो लिटर पाणी वाहुन जात आहे. याकडे महानगरपालिकेचे लक्ष मागील 15 दिवसांपासून नाही.
वजिराबाद भागातील पाण्याच्या टाकीपासून खाली दक्षीण दिशेकडे येणाऱ्या रस्त्यावर मागील 15 दिवसांपासून एक पिण्याचा पाईप फुटलेला आहे. त्यातील हजारो लिटर पाणी दररोज वाहून जात आहे. या पाण्यामुळे वजिराबादमधील पुर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचते. या रस्त्यावर अनेक जागी मोठ-मोठे चार खड्डे आहेत. पाणी साचल्याने खड्डा दिसत नाही आणि अनेक दुचाकी वाहन धारक त्यात पडतात, त्यांना इजा होते, अनेकांच्या गाड्या बंद पडतात पण आपल्याला होणाऱ्या त्रासाची तक्रार करण्याऐवजी आपल्या नशिबाला दोष देवून ते गप्प बसतात. कालच महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये झालेल्या ठरावानुसार शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यात येईल. हे खरे होणार असले तरी आज होणारा पाण्याचा अपव्यय हा कोणाच्या माथी लावला जाणार? सोबतच रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचा जबाबदार कोण याचे उत्तर महानगरपालिकेकडे आहे काय?
Leave a Reply