जालना ( प्रतिनिधी) : वाढदिवसा निमित्त बडेजाव पणा, उधळपट्टी न करता कोरोना मुळे कुटुंब प्रमुख गमावलेल्या महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देत नगरसेवक विजय पवार यांनी विधवा महिलांना आधार दिला आहे. रस्त्यावर शो बाजी करणाऱ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा. असे आवाहन टायगर ग्रुपचे संस्थापक पै. तानाजी जाधव यांनी केले.
नगरसेवक विजय पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
शितल गार्डन येथे शिलाई मशीन व साड्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी पै. तानाजी जाधव,उमेश पोखरकर, शिवसेना शहर प्रमुख तथा गटनेते विष्णू पाचफुले, युवासेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर, जिल्हा समन्वयक अंकुश पाचफुले,नगरसेवक विजय पवार, निलेश जाधव, मनोज पवार, विक्की पवार, राजू सलामपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगरसेवक विजय पवार यावेळी म्हणाले, कोरोना च्या संकटातून सर्व घटक सावरत असतांना वाढदिवसाची भंपक बाजी करणे आपल्या मनास पटले नाही. असे सांगून कोवीड मुळे कर्ते पुरूष गेल्याने माता- भगिनींना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी आपण अल्पसा प्रयत्न केला. असल्याची भावना विजय पवार यांनी व्यक्त केली. शिवसेना नेते , माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, युवा नेते संजय खोतकर यांनी ही शुभेच्छा दिल्या.
दरम्यान मम्मादेवी मंदिर परिसरात फळ वाटप, वाढते इंधन दर पाहता पन्नास दुचाकी स्वारांना पेट्रोल, तसेच शंभर महिलांना साड्यांचे वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
Leave a Reply