ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नगरसेवक विजय पवार यांचे कार्य कौतुकास्पद : ज्योतीताई ठाकरे

January 26, 202212:57 PM 51 0 0

जालना (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना महिला आघाडी शाखा स्थापन करण्यात आली. माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कराव आंबेकर, शिवसेना शहर प्रमुख विष्णु पाचफुले यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 24 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता गांधीचमण येथे महिला आर्थिक विकास मंडळाच्या अध्यक्षा तथा शिवसेना संपर्कप्रमुख ज्योती ठाकरे याच्याहस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हसंघटक सविता किवंडे, कांचन शिरंभे, उप जिल्ह प्रमुख दुर्गा देशमुख, शाखा प्रमुख कमल व्यवहारे, उपजिल्हा संघटक राधा वाडेकर, उपशहर प्रमुख गंगुबाई वानखडे, शहर संघटक मंजुषा घायाळ, उपशहर प्रमुख मंगला मिटकर, उपशाखा प्रमुख मंगल खलसे, बदनापुरच्या उपशहर प्रमुख पुजा टेहरे आदिची उपस्थित होती.
ज्योती ठाकरे यांनी यावेळी बोलतांना सागितले की, जालना शहरात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शाखा स्थापन करण्याचे काम सुरु आहे. प्रभाग क्रं. 13 चे नगरसेवक विजय पवार हे नेहमिच महिलेच्या मदतीसाठी धावून जातात. जालना शहरातील त्यांचे कार्य हे कौतुकास्पद असल्याचे त्या ठाकरे यांनी सांगीतले. यावेळी नगरसेवक विजय पवार, अंकुश पाचफुले, शिवाजी मुळे यासह शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *