ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शालेय बचत बँकेच्या मदतीने जवळ्यात स्वाध्याय निर्मिती

September 27, 202115:42 PM 42 0 0

नांदेड – येत्या चार आॅक्टोबर पासून‌ राज्यातील शाळा उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यानुसार ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या शाळा कोरोनाविषयक अटी आणि शर्तींच्या आधीन राहून सुरू होणार आहेत. नियमावली पाळणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोनाकाळाने सगळ्यात जास्त आपल्या देशातील शिक्षणपद्धतीचे नुकसान केले. आॅनलाईन शिक्षण प्रणाली म्हणावी तितकी प्रभावशाली नव्हती. त्यामुळे साधारणतः गेल्या दीड – दोन वर्षांपासून अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया विस्कळीतच झाली आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने कोणत्याही परिस्थितीत शाळा बंद असली तरीही शिक्षण चालू ठेवणे अनिवार्य मानून आॅनलाईन पद्धतीने किंवा गृहभेटींच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे कोरोनामुळे बंद पडलेले हे शिक्षण चालू ठेवण्यात आले. यात स्वाध्याय ही स्वयंअध्ययन प्रक्रिया फार प्रभावी ठरली. त्यामुळे जवळा दे. येथील मुलांनी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., विषय शिक्षक अंबुलगेकर एस. व्ही., सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय बचत बँकेच्या सहकार्याने इयत्तानिहाय स्वाध्याय निर्मिती केली आहे.


शाळेच्या बचत बँकेत २०१६ पासून काही पैसे जमा होते. कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे शाळाच बंद कराव्या लागल्या होत्या. मार्च २०२० नंतर फारशी बचत करता आलेली नव्हती. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी बचत बँकेत जमा असलेले पैसे आणि त्यात शिक्षकांच्या आर्थिक सहयोगाने स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती करता येईल का हा विचार मांडला. सदरील निधी विधायक कार्यालाच वापरण्यात येईल असे बँक निर्मितीच्या वेळीच ठरले होते. त्यामुळे आता वरच्या वर्गातील मुलांनी खालच्या वर्गातील मुलांसाठी ही शाळास्तरावरची स्वाध्याय निर्मिती केली आहे. यात गंगासागर शिखरे, संध्या गच्चे, अंजली झिंझाडे, गणेश मठपती, संघरत्न गोडबोले, मुस्कान पठाण, साक्षी गोडबोले, अक्षरा गोडबोले, शुभांगी गोडबोले, शादूल शेख श्रुती मठपती, अनुष्का झिंझाडे, दीपाली गोडबोले, निशा गोडबोले, अक्षरा शिंदे, लक्ष्मण शिखरे, अक्षरा शिखरे यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचा फायदा शाहेद शेख ,रितेश गवारे, सिध्दांत गोडबोले, गितांजली गोडबोले, पिरखाँ पठाण, सोनल गोडबोले, सुप्रिया गच्चे या विद्यार्थ्यांसह अनेकांना होत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *