ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

निर्मितीच्या शब्द कळा पुरस्कार वितरण

January 3, 202115:07 PM 164 0 0

जालना – सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या बरोबरच ग्रामीण जीवनाचे ताणे बाणे मांडणे हाच व्यवस्थेचा बइल या कथासंग्रहाचा हेतू असल्याचे प्रतिपादन ग्रामीण कथाकार डॉ.प्रभाकर शेळके यांनी व्यक्त केले.मुद्रा साहित्य सेवा संस्थेच्या वतीने निर्मितीच्या शब्दकळा या कार्यक्रमात डाॅ.प्रभाकर शेळके यांचा भि.ग रोहमारे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार सोहळा व सुप्रसिद्ध कवी सुनिल लोणकर यांचे काव्यवाचणाचे आयोजन करण्यात आले होते.

कवी लोणकर यांनी धकाधकीच्या जीवनावरची आणी भोवती गर्दी असूनही आपण कसे एकटे आहोत ही भावना व्यक्त करणारी मुंबईतले जीवन या कवितेबरोबरच अनेक हिंदी मराठी कविता आणि गझल सादर करून आपला काव्यप्रवास उलगडून दाखवला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश देहेडकर यांनी मुद्रा साहित्य सेवा संस्थेच्या वतीने घेण्यात येणारा निर्मितीच्या शब्दकळा हा उपक्रम कला क्षेत्रात एक नांदी ठरेल असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पंढरीनाथ सारके यांनी केले तर प्रा.ज्योती पोहेकर व प्रा.चारूशीला दाभाडकर यांनी सुत्रसंचलन केले.मनिष पाटील यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला कवी कैलास भाले,प्राचार्या अपर्णा पवार,नवनाथ लोखंडे,कवयत्री रेखा गतखणे,प्रा.दिंगबर दाते,किरण कांबळे,विलास भाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *