ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी सतिष जैस्वालसह तिघांविरुध्द गुन्हा

August 20, 202114:55 PM 13 0 0

जालना (प्रतिनिधी) ः महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुटखा माफिया सतिष जैस्वालसह तिन जणांविरुध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या संदर्भात सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत 18 वर्षीय युवतीने म्हटले आहे की, मी माझ्या वडीलांसोबत काल दि. 18 ऑगस्ट रोजी सांयकाळी सोबत गेले असतांना माझे वडील व सतिष जैस्वाल यांच्यात पैशाच्या देवान घेवान वरुन वाद झाल्यानंतर माझ्या वडीलांसोबत सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असतांना सिंधीमंदीर चौकात सतिष जैस्वाल , उमेश जैस्वाल आणि आशिष कांबळे या तिघांनी त्यांची मोटारसायकल आडवी लावुन माझ्या वडीला मारहाण केली. व माझ्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे तक्रारीत नुमत केले आहे. या सर्व प्रकारामुळे आम्ही भयभित झाल्यानंतर तुम्ही पोलीसात तक्रार करता का? असे म्हणुन चाकुने फाडुन टाकण्याची धमकी दिली. सदर युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन उपरोक्त तिघांविरुध्द सदर बाजार पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून तपास पोउपनी गणेश झलवार हे करत आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *