ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

करारी रोटी कुरकुरीत टोकरी

October 11, 202116:18 PM 80 0 0

मैत्रिणींनो करारी रोटी किंवा कुरकुरीत टोकरी भारतातील बर्‍याच रेस्टॉरंट्समध्ये स्टार्टर म्हणून दिली जाते. ही रोटी टोकरीसारखी दिसते,म्हणुन तिला टोकरी रोटी पण म्हणतात

साहित्य :- १ बाऊल मैदा,
२ ते ३ टिस्पून तेल, मीठ
चाट मसाला, लोणी, कोथिंबीर लाल तिखट, चिली फ्लेक्स, ओराॅगनो

कृती :-मैद्यात तेल व मीठ टाका. थोडे थोडे पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. पीठ झाकून ठेवा आणि १० मिनिटे बाजुला ठेवा.
२)१० मिनिटानंतर पीठ पुन्हा मळून घ्या. आता त्याचे ६ समान भाग करा.

३) एक गोळा घेऊन ओट्यावर सुके पीठ भुरभुरून लाटण्याने पातळ पोळी लाटून घ्या.

४)आता अ‍ॅल्युमिनियमची कढई घेऊन ती गॅसवर उलटी ठेवा. कढईला मागच्या बाजूलाने किंचित तेलाचा हात लावून मध्यम आचेवर ५ मिनिटे गरम करा त्यामुळे
रोटी कढईला चिकटत नाही.

५)रोटी उपड्या कढईवर टाका व व्यवस्थित पसरवा. मंद आचेवर शिजू द्या. कापडाचा वापर करुन रोटीला सगळ्या बाजूंनी प्रेस करून शेकावा. कुरकुरीत झाल्यावर हळू हळू करा व रोटी काढून घ्या . अशा तऱ्हेने सर्व रोट्या तयार करा.

६)वितळलेले बटर घ्या आणि त्यात मिरची पूड , चिली फ्लेक्स, ओराॅगोनो, आणि चाट मसाला घाला. चांगले मिसळा.
६)हे मिश्रण करारी रोटीवर लावा. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
टेस्टी करारी रोटी नक्की करून बघा मुलांना व मोठ्यांना पण खुप आवडते
मुखवास लाडू (खाऊच्या पानांचे लाडू)
हे सुपारी विरहीत लाडू विड्याच्या ऐवजी जेवणानंतर खाता येतात. चवीला उत्तम लागतात
कृती-
खायचे पान २० मिक्सरमधून काढून घ्यावे. Condensed milk (200 gram) आणि decicated coconut powder (150 gram) घालून १५ मिनीटे मंद आचेवर परतावे.
थंड होण्यासाठी ठेऊन द्यावे.
स्टफिंगसाठी – काजू बदामाचे तुकडे, टूटीफ्रुटी, गुलकंद, बडीशेप, विलायची याचे मिश्रण तयार करावे. पानाचा लाडू वळताना प्रत्येक लाडूमध्ये हे मिश्रण एक चमचा घालावे. लाडूला वरून खोवलेले खोबरे भूरभूरून चेरीचे काप लावून सजवावे….
कलाकंद

साहित्य:

ताजे पनीर – २ कप, किसलेले
दुधाची पावडर – १/२ कप
फ्रेश क्रीम – १ कप
साखर – ३/४ कप
वेलची पावडर – १/२ टीस्पून
सजवण्यासाठी:

बदाम काप – १ टेस्पून
पिस्ता – १ टेस्पून
आवश्यक वेळ:

३ तास १७ मिनिटे
सर्व्हिंग्स:

२५ तुकडे
पद्धत:

वेलची पूड वगळता, सर्व साहित्य एका पॅनमध्ये एकत्र करून चांगले मिक्स करावे.
मिश्रण घट्ट होईपर्यंत किंवा १५ मिनिटे मध्यम आचेवर शिजवा. ढवळत राहा आणि बाजूंना स्क्रॅप करा
मिश्रण गॅसवरून काढा आणि नंतर वेलची पूड घाला. चांगले मिक्स करा
हे मिश्रण तूप लावलेल्या थाळीत घाला. मिश्रण समान पसरवा
ते पिस्ता आणि बदाम घालून सजवा आणि हलकेच थापून घ्या जेणेकरून गार्निश मिश्रणाच्या पृष्ठभागावर चिकटून राहील. हे बाजूला ठेवा आणि ३ तास थंड होऊ द्या
आता त्याचे तुकडे करू शकता आणि नंतर सर्व्ह करू शकता.
दुध पाक

साहित्य:

पूर्ण चरबीयुक्त दूध-५ कप
केशर
कोमट दूध – १ टेस्पून
तांदूळ – १ टेस्पून
तूप – १ टेस्पून
साखर – १/२ कप
वेलची पावडर – १/२ टीस्पून
सजवण्यासाठी:

बदाम काप – १ टेस्पून
पिस्ता – १ टेस्पून
आवश्यक वेळ:

३२ मिनिटे
सर्व्हिंग्ज:

४ सर्व्हिंग्ज
पद्धत:

एका भांड्यात १ टेस्पून कोमट दूध आणि केशर एकत्र करा आणि हे बाजूला ठेवा
तांदूळ चांगले धुवून घ्या. त्यात थोडे तूप आणि दूध घाला. बाजूला ठेवा
दुध एका कढईत मोठ्या आचेवर ठेवा आणि मध्ये मध्ये दोनदा हलवा. यास फक्त ५ मिनिटे लागतील
तूप-तांदळाचे मिश्रण घालून पुन्हा चांगले मिक्स करावे. अधूनमधून ढवळत असताना मध्यम आचेवर सुमारे १५ मिनिटे शिजवा. कढईच्या बाजू खरडून घ्या
केशर-दुधाचे मिश्रण, साखर आणि वेलची पूड घाला. हे सर्व साहित्य नीट एकत्र करा आणि मंद आचेवर सुमारे ७ मिनिटे शिजवा किंवा साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत शिजू द्या. अधून मधून हलवा
ते थोडे थंड होऊ द्या
पिस्ता आणि बदाम काप घालून सजवा आणि थंड झाल्यावर सर्व्ह करा
गुळाच्या कडकण्या :-
आम्ही लहान असताना आमच्या आजोळी जायचो आई बरोबर नवरात्रीत एखाद्या दिवशी गावाकडच्या देवीला ओटी द्यायला तेंव्हा आमची आक्का (आजी) मस्त डाळ गुळाच्या कडकण्या करायची.आताच्या सगळ्या बायका मैद्याच्या, रव्याच्या कडकण्या करतात पण आजीच्या हातच्या कडकण्यांची सर मात्र त्यांना नाही चला मी सांगते ती कशी बनवायची ते
सगळ्यात आधी यासाठी लागणारे साहित्य : 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, पाव वाटी मैदा, पाव वाटी तांदूळ पीठ, 4 चमचे तूप, 1 वाटी किसून घेतलेला गूळ, हळद, जिरे 1 चमचा, सुंठ 1 चमचा,बडीशेप 1 चमचा, वेलची 4, काळी मिरी 2… हे सगळं आधी जमा करून मग ती कडकण्या करायला घ्यायची. आधी सुंठ, जिरे, बडीशेप, वेलची,आणि मिरी हे सगळं बारीक पूड करून घ्यायची. मग एका भांड्यात 1 वाटीभर पाणी उकळत् ठेवायची त्यात किसलेला गूळ घालून छान ढवळत राहायची, त्यातच गूळ विरघळायला लागला की वरची मसाल्याची पूड घालायची आणि त्यातच 4 चमचे तूप घालून कडकणी साठी खमंग गुळाच हे पाणी तयार व्हायचं. ते थोडं थंड झालं की वर सांगितलेली सगळी पीठ परातीत घेऊन त्यात गुळाचं तयार केलेलं पाणी घालून चांगली कणिक तयार करून घ्यायची. ही कणिक चांगली तासभर भिजत ठेवून ती तिची उरली सुरली बाकी काम करून घ्यायची. नंतर पुरण पोळी साठी चं पुरण ज्या पाट्या वर वाटायचं असतं त्यावर ही कणिक वरवंट्यान खूप छान चेचून घ्यायचो त्याचे छोटे छोटे पेढया सारखे दिसणारे गोळे बनवून आमच्या कडून ती त्याच्या गोल गोल पुऱ्या लाटून घ्यायची आणि त्या झटपट तेलात तळून आम्हाला खायला द्यायची. शिवाय सुट्टी संपून घरी जाताना कडकण्या चा डबा द्यायला ती विसरायची नाही 😊 ..
दही

मागील पोस्ट दहीवडे होती.
त्यासाठी अर्थातच घट्ट दही लागते आणि हे उत्तम दही घरी कसे लावायचे यासाठी आजची ही पोस्ट-

१) दूध
२) विरजणासाठी थोडे दही

घट्ट दही हवे असल्यास शक्यतो म्हशीचे दूध घ्यावे. ताक, कढी आदींसाठी गायीच्या दूधाचा वापर करावा.
कच्च्या म्हणजेच न उकळलेल्या दूधाचे दही लावू नये.
किमान एकदा तरी दूध व्यवस्थित उकळावे.
दही लावताना दूध गरम नसावे, तसेच ते फ्रीजमधील थंडगार देखील नसावे.
दूध शक्यतो कोमट किंवा रूम टेमपरेचरचे असावे.
विरजण म्हणजेच थोडेसे दही हेसुद्धा फ्रीजमधील थंडगार नसावे.
रोज लावलेले दही संपत आले की न विसरता त्यातले थोडे दही नव्या दह्याचे विरजण लावण्यासाठी बाजूला काढून ठेवावे.
घरात विरजणासाठी दही नसेल तर डेअरीमधून ताजे सुट्टे दही आणावे. मात्र डबाबंद पॅक दही विरजणासाठी अजिबात वापरू नये.
विरजणासाठी थोडेही दही उपलब्ध नसेल तर कोकम वापरावे, दही तयार झाल्यावर कोकम आणि बाजूचे थोडे दही काढून टाकावे.

गरम दूधाला विरजण लावले, तर दही चोथा-पाणी होते.
गार दूधाला विरजण लावले तर दही लागत नाही.

दही लावताना, वेगवेगळ्या ऋतूंचा आणि निरनिराळ्या भौगोलिकतेचा विचार करून दूधाच्या तापमानात आणि घालायच्या विरजणाच्या प्रमाणात फरक करावा.
उन्हाळ्यात अर्ध्या लिटर दूधाला विरजण लावण्यासाठी १ छोटा चमचा दही पुरते.
हिवाळ्यात हेच प्रमाण १ मोठा चमचा.

ज्या भांड्यात दही लावायचे त्यात हे विरजण थोडेसे फेटून घ्यावे.
मग त्यात कोमट दूध ओतायचे.
दही घट्ट लागण्यासाठी विरजण घातलेले दूध एका भांड्यातून दुसर्‍या भांड्यात उंचावरून ६-७ वेळा (दुधाला छान फेस येईपर्यंत) ओतायचे. यामुळे हवेतला ऑक्सिजन छानपैकी मिसळला जातो आणि घातलेल्या विरजणाचा कण अन् कण मोकळा होऊन संपूर्ण दूधात विरजणाचा अंश मिसळतो. यामुळे दही छान घट्ट लागते.
उन्हाळयात शक्यतो दिवसा दही लावावे, म्हणजे ३ ते ४ तासात दही उत्तमरीत्या लागते आणि खूप आंबट होत नाही.
हिवाळ्यात भांडे झाकून उबदार ठिकाणी रात्रभर किंवा किमान ६-७ तास ठेवावे.
मायक्रोव्हेव २ ते ३ मिनिट नुसताच मायक्रोवर फिरवावा, म्हणजेच प्रीहीट करावे. आणि नंतर अर्थातच बटण बंद करून त्यात विरजण लावलेले भांडे ठेवावे. साधारण ३ ते ४ तासांत उत्तम दही लागते.
धातूच्या भांड्यापेक्षा सच्छिद्र मातीच्या भांड्यात दही अधिक चांगले लागते.
दही लागल्यावर ते फ्रिजमध्ये ठेवा. जास्तवेळ उघडे ठेऊ नका त्यामुळे ते आंबट होईल.
एकदा दही लागले की शक्यतो त्याच दिवशी वापरावे. किंवा फ्रीजमध्ये २ दिवसांपर्यंत ठेवावे. घरी बनवलेले दही दोन दिवसांपेक्षा अधिक काळ वापरू नये.

Categories: रेसिपी, लेडीज स्पेशल
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *