नांदेड प्रतिनिधी (सारिका बकवाड) – ता.५ आज भारतीय स्टेट बँक शाखा परंडा मंडई पेठ परंडा (SBI) अंतर्गत भोंजा हवेली येथे पीक कर्ज नुतनीकरण मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी बॅंक मॅनेजर निलेश निवृत्ती बोंबले यांनी बॅंक खातेदार शेतकरी यांना पीक कर्जाचे महत्व पूर्ण मार्गदर्शन करताना पीक कर्जाचा फायदा केंद्र शासन व राज्य शासन यांची ७% सवलत व वार्षिक वाढीव १०% रक्कम नुतनीकरण केल्यास मिळते आणि शेतकर्याचें सीबिल चांगले राहते. तसेच येणार्या २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत असुन २०१७ च्या आतील सर्व थकीत कर्जदार शेतकरी बंधू भगिनींना तात्काळ दिलासा देण्याचा प्रयत्न तडजोड मध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
वेळोवेळी शेतकर्याच्यां समस्या दूर करण्यासाठी SBI बॅंक कायम शेतकर्याच्यां सेवेशी आहे तसेच नवीन लाईफ ईन्शुरन्स, कुटुंब आरोग्य विमा, व्यक्तीक आरोग्य विमा विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी अभयसिंहराजे मोहिते यांनी हेल्थइंशुरन्स १२०० रू. मध्ये १ लाख, फॅमिलीसाठी १०५०० रू. मध्ये ३ लाख तसेच डेथ इंशुरन्स करीता वार्षिक २०० रू. साठी ४ लाख, ५०० रू. साठी १० लाख व १००० रू. साठी २० लाख असून या योजनेचा लाभ ग्राहकांनी अवश्य घ्यावा. यावेळी उपस्थित फिल्डआॅफिसर गुप्ता जी, संचालक श्रीनिवास भांदुर्गे, लघुउद्योग सल्लागार/ डायरेक्टर गणेश नेटके, चेअरमन सुब्राव मोरे, बागायतदार सतिश नेटके, बागायतदार नवनाथ मोरे, मिटूतात्या नेटके, अमोल मोरे, बापुराव नेटके, बाबुराव कोंडलकर, समन्वयक महेश पाटील, बाळासाहेब भांदुर्गे, दादा मोरे, राजभाऊ मोरे, शिवाजी नेटके, दादासाहेब जगताप, भारत नेटके, हनुमंत कोंडलकर, दिपक घाडगे, वाल्मीक कोळी, अंकुश कोळी, रामदास जाधव, बाळासाहेब कांबळे, इ.मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Leave a Reply