ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक उमेदवारांची गर्दी; युती-आघाडीचा निर्णय राजेश टोपे यांचा मान्य

July 15, 202215:23 PM 12 0 0

जालना । प्रतिनिधी – आगामी जालना नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे गुरुवार (दि 14) रोजी सकाळी 11 वा. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीसाठी जालना नगर पालिका क्षेत्रातील बहुसंख्य वार्डातील इच्छुकांनी हजेरी लावली होती. इच्छुकांच्या गर्दीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारांचा कल यावेळी पहायला मिळाला. आगामी निवडणुकीत युती अथवा आघाडी संदर्भात जो काही निर्णय माजी मंत्री राजेश टोपे घेतील तो निर्णय पक्षाला मान्य राहील अशी एकमुखी निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री राजेश टोपे व जिल्हाध्यक्ष निसार देशमुख यांच्या आदेशानुसार पक्षाचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी आगामी जालना नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. कार्यक्रमाला रशिद पहेलवान यांनी मोलाचे मार्गदशन केले. तसेच नुर खान यांनी निवडणुकीची तयारी करण्यासंदर्भात सूचना केल्या. त्याप्रमाणे संजय दाड यांनी पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शाह आलम खान, सामाजिक न्या विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश खंडागळे यांनी खर्‍या कार्यकर्त्यांना न्याय देणार असे आश्‍वासन दिले. व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे यांनी उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. बंडखोरी करू नये केल्यास पक्ष कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी कडक शब्दात सांगितले. युवक शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी युवकांना जास्तीत जास्त संधी द्यावी अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडे केली. तसेच युती-आघाडी संदर्भात जो काही निर्णय राजेश टोपे घेतील तो सर्वांना मान्य राहील असेही श्री जाधव यांनी सांगितले. मिर्झा अनवर बेग यांनी अल्पसंख्यांक समाजाला न्याय देऊन जास्तीत जास्त उमेदवारांना संधी द्यावी अशी मागणी केली. तय्यब देशमुख यांनी सच्चा कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन पक्षाने त्यांना पाठबळ द्यावे, सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी व्यासपीठाकडे केली. अकबर खाँ बने खाँ यांनी युती-आघाडी करण्यासंदर्भात ज्यांनी मान सन्मानपुर्वक जागा दिल्या त्यांच्या बरोबर जाण्याची इच्छा व्यक्त करतांना याबाबत श्री टोपे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी बबलु चौधरी, आमेर पाशा, जयंत भोसले, इसा खान, ज्ञानेश्‍वर धानुरे, मोहन क्षीरसागर, विजय कांबळे, सय्यद रहिम, मनकर्णाताई डांगे, फारुख तुंडीवाले, अहेमद बिन चाऊस, कैलास मगरे, मनोज देवरे, रमेश मुळे, फाद चाऊस, आमेर सिद्दीकी, इर्मान मनियार, डॉ, सोनी, रहेमान परसुवाले, राम देवकर, अ‍ॅड. दिनेश दैने, फेरोज कुरेशी, अमजद खॉ अकबर खॉ, अजहर तांबोळी, अमर डांगे, सुजाता डांगे, काळे ताई, कामरान खान यांच्यासह इच्छुक उमेदवारांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *