ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दि.बा. पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरणाची मशाल पेटली

August 11, 202121:26 PM 57 0 0

उरण  (संगिता पवार ) : दि ..बा. पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व पक्षीय कृती समितीच्या नावाने आपण एक संघ होवून आपण जर नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देवू शकलो तरच आपल्या समाजाला न्याय देण्याची प्रक्रिया सूरू होईल असे प्रतिपादन दिं.बा. पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व पक्षीय समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील जासई येथे केले. दि.बा. पाटील यांचे नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला नाव द्यावे यासाठी 9 ऑगस्ट क्रांतीदिनाचे निमित्त साधून दि.बा. पाटील यांच्या जन्मगावी जासई येथे मशाल मोर्चाचे आयोजन केले होते त्यावेळेस ते बोलत होते. दि. बा. पाटील यांच्या नावासाठी जासई येथून पेटवीलेली ही मशाल लोकांमध्ये प्रकाश पाडून हा नामांतरणाचा लढा यशस्वी करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\

यावेळेला त्यांनी पुढे बोलताना सांगितले की जर 15 ऑगस्ट पर्यंत दि.बा. पाटील यांच्या नामकरणासंदर्भात जर सकारात्मक निर्णय संबधित सरकारने घेतला नाही तर 16 ऑगस्ट पासून विमानतळाची सर्व प्रकारची कामे बंद करण्याचा इशारा देखिल यावेळी त्यांनी दिला. तसेच नवी मुंबईला न्याय मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जसे प्रकल्पग्रस्तांच्या पाठी उभे राहिले तसेच दि.बा. पाटील यांच्या नामकरणासंदर्भात नामकरण कृती समितीच्या मागे उभे राहून दि.बा. पाटील यांचे विमानतळाला नाव  देण्यासाठी
सहकार्य करावे असे आवाहन दशरथ पाटील यांनी केले. दि.बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला
नाव द्यावे यासाठी 9 ऑगस्ट रोजी जासई येथे विशाल मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामोर्चासाठी रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चाची सुरूवात जासई येथिल हूतात्म्यांना अभिवादन करून आणि दि.बा. पाटील यांच्या पुतळ्याचे पुजन करून मशाल पेटविण्यात आली. या मशाल मोर्चावेळी वेगवेगळ्या भागात प्रकल्पग्रस्तांकडून मशाल नेण्यात
आल्या. प्रकल्पग्रस्तांच्या सगळ्या गावात या मशाली नेवून जनजागृती करण्यात येणार आहे. या मशाल मोर्चाला दि.बा. पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील. उपाध्यक्ष रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कॉ. भूषण पाटील, पनवेलचे उपमहापौर जगदिश गायकवाड, यांनी मार्गदर्शन केले. याकार्यक्रमाला शेकडो प्रकल्पग्रस्त महीला,पुरूष कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *