ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बाप्पा तु सुद्धा महागलास

August 30, 202217:29 PM 13 0 0

स्विस बँकेतील पैसा तिथच राहिला,.
भारतात तो येणार,,आम्ही स्वप्नातच पाहिला..

जिकडं-तिकडं महागाई
GST,, ने खेळ खलास….
देवा तुझ्याव भरोसा होता
तु सुद्धा यंदा महागलास …!!

देवाची किंमत मी करत नाही
ह्या महागाईत गीन्ना उरत नाही
जिव वैतागून जातो कष्ट करुन
पुढारी सुखी स्वताच पोट भरुन..

हे सगळं देवा बघत हसलास,
बाप्पा ,..यंदा तु सुद्धा महागलास ,..!!

मोदिशेठ निवडुन यावे म्हणून ,
नवसं लोकांनी केली..
शेठनेही भली-मोठी आश्वासनं दिली….

तुझ्या मोदकावर GST लागलाय,
मोदक जड झालेला, तु पाहिलास..
बाप्पा ..यंदा तु सुद्धा महागलास …

 

गरीब तुझे भक्त आम्ही
अंध भक्तावर विश्वास ठेवलास,
बुद्धिची देवता असून तु ,
असाकसा देवा फसलास..

मन की बात आयकून,
बहुतेक तु गहीवरलास…
बाप्पा ,,.यंदा तु सुद्धा महागलास …

सुडाच राजकारण सर्वत्र झोंबतय
ED च नोटीस दाराजवळ थांबतय
खोके व ओक्के यासाठी बंडाळी, यांची दिवाळी जनतेची होळी ..

आयकुन घे देवा तुळशीरामची पुकार..
तु तरी कर ,,, ही महागाई हद्दपार…
कसा तुझा सणं करु, आर्थीक बाजुने बेजार..
कवा जागे होईल,, आमचं नमो-नमो सरकार…

मोदिशेट रुसला त्यो रुसला,
तु पण…..आमच्याव रुसलास..
काय चुकलं..रे देवा..
आमच्या पासुन दुर बसलास..
बाप्पा …यंदा तु सुद्धा …महागलास…!!!

गणपती बाप्पा मोरया…!!!
स्वस्ताई ..घेवून ….या..!!!

 तुळशीराम सुतार

Categories: कविता, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *