जालना। जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने रेल्वेच्या विविध समस्यांबाबत रविवारी (दि़ 15) स्वातंत्र्यदिनी टीपु सुलतान चौक येथे अध्यक्ष गणेशलाल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी आ़ कैलाश गोरंट्याल यांनी धरणे आंदोलनस्थळी भेट देऊन गेट नं़ 78 साठी नगरपालिकेकडुन आर्थिक सहकार्य मिळुन देऊ असे आश्वासन दिले़
जालना-खामगाव-मनमाड-परभणी दुहेरीकरण, गेट नं़ 78 साठी 2014-15 ला मिळालेले 3 कोटी रूपये खर्च करून हा गेट त्वरीत बांधावा़ तसेच रेल्वे स्टेशन जालना प्लॅटफार्म 4 व दक्षीण बाजु रेल्वे स्थानकाची ईमारत आणि पीठलाईन करण्यात यावी, यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे पदाधिकारी सुभाषचंद्र देविदान, फिरोजअली मौलाना, अशोक मिश्रा तसेच अर्जुन गेही, विनीत साहनी, दिनकर घेवंदे, संतोष गाजरे, गेंदालाल झुंगे, ओमप्रकाश चित्तळकर, सुरेश सद्गुरे, विष्णु पाचफुले यांची भाषणे झाली़ रेल्वे समस्या त्वरीत सोडविण्यात याव्या, अन्यथा रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने तिव्र धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला़
या धरणे आंदोलनात रेल्वे संघर्ष समितीचे सदस्य सुरेखा गायकवाड, अनया अग्रवाल, रमेशचंद्र अग्रवाल, बाबुमामा सतकर, छोटे खां पठान, अफसर चौधरी, अंकुश पवार, किशोर जांगडे, धर्मा खिल्लारे, ईश्वर बिल्होरे, भरत जाधव, दिपक गडबडे, किशोर चव्हाण, संजय खरात, सुनिल बियाणी, अशाेक हुरगट, रामकुंवर अग्रवाल, रामदेव क्षोत्रिय, पोपट यांची उपस्थिती होती़ या धरणे आंदोलनाला 187 नागरिकांनी आपला पाठिंबा दर्शविला़ प्रास्ताविक फिरोज अली मौलाना यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाषचंद्र देविदान यांनी केले़
Leave a Reply