ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दुनियादारी कार्यालयात धाडसी चोरी

February 24, 202123:18 PM 62 0 0

जालना  (प्रतिनिधी) शहरातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या दैनिक दुनियादारी कार्यालयात मंगळवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी चॅनल गेटसह एका कॅबीनचे कुलूप तोडून धाडसी चोरी करुन पोलीस व माध्यमांसमोर एक नवे आव्हान उभे केले आहे.

कार्यालयातील रात्रपाळीतील कर्मचारी रात्री आपले काम आटोपून मध्यरात्री बारा वाजता कार्यालयाला कुलूप लावून घरी गेल्यानंतर चोरट्यांनी सुरुवातीला चॅनल गेटचे कुलूप तोडले. त्यानंतर कार्यालयातील संपादकांच्या कॅबीनचे लॉक तोडून आत प्रवेश केला. टेबलाची सर्व कप्पे धुंडाळून आतील शासकीय फाईल्स् अस्ताव्यस्तपणे फेकल्या तसेच काही फाईल्स् सोबत घेऊन गेले. कॅबीनमध्ये असलेला सॅमसग कंपनीचा अकरा हजार रुपये किंमतीचा एलसीडी टीव्ही नेला. विशेष म्हणजे चोरट्यांनी संगणक, प्रिंटर किंवा छपाई मशिनच्या कोणत्याही वस्तूला हात लावला नाही.

कार्यालयात असलेल्या तीन कपाटापैकी एकाही कपाटाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे चोरट्यांचा चोरीचा नेमका उद्देश काय असावा, याबद्दल दैनिकाचे कर्मचारी आणि खुद्द पोलीस अधिकारी संभ्रमात आहेत. उपसंपादक मधुकर मुळे यांच्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवि 461, व 380 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय देशमुख यांनी आपल्या अधिकारी व कर्मचार्‍यासह घटनास्थळी येऊन चोरीची पाहणी केली. त्यांनी घटनास्थळी श्वान पथक, आणि ठसे तज्ञांना बोलावून बारकाईने पाहणी केल्यानंतर तपासासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *