सातारा प्रतिनिधी(विद्या निकाळजे)
बिनभिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरु!
झाडे वेली पशुपाखरे
यासि गोष्टी करु!!
या उक्तीप्रमाणे आज जि .प .शाळा माणगंगानगर (ता.माण, जि. सातारा)शाळेच्या मुख्याध्यापिका दयाराणी खरात यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेच्या आवारात विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करुन आपल्या शाळेत गुरुपौर्णिमा साजरी केली.
निसर्ग हा आपला पहिला गुरु,विद्यार्थ्यांना आदर निर्माण व्हावा,पर्यावरणाची जाणीव व पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी श्रीमती खरात यांनी आपल्या शाळेत कडूलिंब.आशोक,बदाम,पिंपळ,गुलमोहर,इ. झाडांची लागवड केली .
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शुभांगी जाधव, सरपंच शशिकांत जाधव माजी सरपंच तसेच पालक व ग्रामस्थ उपस्थित होते झाडे लावून ग्रामस्थांच्या मदतीने तारेचे कुंपण करुन घेतले
Leave a Reply