ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

प्रज्ञांकुर विशेषांकासाठी साहित्य पाठविण्यास ३० मार्चपर्यंत मुदतवाढ

March 23, 202215:04 PM 33 0 0

नांदेड – येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या राज्य शाखेकडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला समर्पित ‘प्रज्ञांकुर’ या विशेषांकाची निर्मिती करण्यात येऊन वैचारीक जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी साहित्यिक, लेखक तथा विचारवंतांकडून बाबासाहेबांशी संबधीत साहित्य २५ मार्चपर्यंत मागविण्याचे आवाहन करण्यात आले होते. आता त्यास मुदतवाढ देऊन ३० मार्च अखेर आपले साहित्य पाठवावे असे विशेषांकाचे मुख्य संपादक तथा सप्तरंगी साहित्य मंडळाचे कार्याध्यक्ष मारोती कदम यांनी कळविले आहे.

सप्तरंगी बहुउदेदशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने ‘प्रज्ञांकुर’ या विशेषांकाच्या माध्यमातून वैचारिक जयंती साजरी करण्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व चिंतक, अभ्यासक, लेखक, कवी, साहित्यिक, संशोधक, विचारवंत तथा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांच्याकडून लेख, कविता, ललित, कथा तथा वैचारिक साहित्य मागविण्यात येत आहे. या करिता कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तरी इच्छुकांनी आपले साहित्य सुवाच्च अक्षरांत लिहून अथवा चक्रमुद्रीत करुन पोस्टाद्वारे संस्थेचे कार्यालय अनुरत्न वाघमारे, राष्ट्रमाता शाळेसमोर बेलानगर नांदेड या पत्यावर किंवा [email protected] या ईमेलवर उशिरात उशिरा ३० मार्च २०२२ पूर्वी पाठवावेत. अधिक माहितीसाठी ९०४९०२५३५१ या व्हाटसप क्रमांकावर संपर्क साधावा असे सल्लागार मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे. ‘प्रज्ञांकुर’ या भीमजयंती विशेषांकाच्या निर्मितीसाठी नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, कैलास धुतराज, प्रज्ञाधर ढवळे, शंकर गच्चे, रुपाली वागरे वैद्य, बाबुराव पाईकराव, प्रशांत गवळे, रणजित गोणारकर हे पुढाकार घेत आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *