ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

विविध मागण्यांसाठी चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे आमरण उपोषण सूरू

December 12, 202112:21 PM 62 0 0

उरण दि 7(राघवी ममताबादे ) : चाणजे शेतकरी संघर्ष समितीने शासन दरबारी अनेक वेळा कायदेशीर, शांततेच्या मार्गाने पत्रव्यवहार करून देखील शासनाने शेतकऱ्यांच्या महत्वाच्या समस्यांकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले. चाणजे हद्दीतील अतिक्रमण तसेच समुद्राचे पाणी व खारफुटीचे अतिक्रमण झालेल्या शेतजमिनीची शासनाने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा संबंधित जमीन संपादित करावी.साकव वर हाईट गेज पूर्ववत करणे, साकवची प्लॅप गेट कायम स्वरूपी ठेवणे.

शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करणे आदी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तसेच शेतकऱ्यांवर, स्थानिक भूमीपुत्रावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून आज दि 7/12/2021 पासून सिडको कार्यालय, द्रोणागिरी येथे आमरण उपोषण सुरु करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी दिली.सदर प्रश्न मार्गी लागण्यासाठी कायदेशीररित्या मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रधान सचिव महसूल विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक कांदळवन कक्ष मुंबई, जिल्हाधिकारी रायगड, तहसीलदार उरण, भूमी व भूसंपादन अधिकारी सिडको नवी मुंबई, सहाय्यक पोलीस आयुक्त न्हावा शेवा बंदर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे आदी ठिकाणी वेळोवेळी अनेकदा पत्रव्यवहार केला असूनही बाधित शेतकऱ्यांच्या, उपोषण कर्त्यांचे मागण्या मान्य होत नसल्याने आज मंगळवार दि 7/12/2021 पासून बाधित शेतकऱ्यांद्वारे सिडको कार्यालय द्रोणागिरी येथे मरे पर्यंत उपोषण करण्यात येईल. व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशारा चाणजे शेतकरी संघर्ष समितीने यावेळी प्रशासनाला दिला आहे.उपोषणाचा आज दिनांक 7/12/2021 रोजी उपोषणाचा पहिला दिवस आहे. मात्र अजूनही एकही शासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.यावेळी उपोषण स्थळी चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे,उपाध्यक्ष अरुण पाटील,सेक्रेटरी निशिकांत म्हात्रे,खजिनदार नितीन म्हात्रे,सहसेक्रेटरी परशुराम थळी,सहखजिनदार कृष्णा पाटील,व्यवस्थापक रुपेश म्हात्रे,सल्लागार ऍडव्होकेट रत्नदीप पाटील,चाणजे ग्रामपंचायत सरपंच मंगेश थळी , चांणजे ग्रामपंचायत सदस्य व्यंकटेश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *