जालना (प्रतिनिधी) शासकीय आणि जिल्हा परिषद कर्मचारी गृहनिर्माण संस्थांना घरबांधणी कर्जाचे वाटप वस्त्रोद्योग व पणन महामंडळाने केलेले असून त्या संभासदांना आजपर्यंत मान्य करण्यात आलेले कर्ज रक्कम, अलॉटमेंट लेटर, ताबा पावती, भाग प्रमाणपत्र इत्यादी अप्राप्त आहेत. त्यामुळे मयत आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांना सेवानिवृत्ती वेतन व देय लाभ अद्यापही अप्राप्त असून त्यामुळे त्यांची आजारपणासाठी सुद्धा आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे. एका सभासदास दोन गृहनिर्माण दिलेल्या सभासदांना गृहनिर्माण संस्थांनी पैसे न भरल्यामुळे सेवानिवृत्त वेतन व देय लाभापासून आज पर्यंत वंचित ठेवले असल्यामुळे गटविमा गृहनिर्माण कृती समितीच्या वतीने आज (दि. 15) डिसेंबर मंगळवार पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मा. उपनिबंधक जिल्हा जालना नानासाहेब चव्हाण यांनी तीन बैठका घेवून सर्व बिल्डरांना सर्व कागदपत्रे देण्याचे आदेश दिले असतांना देखील बिल्डरांकडून टाळाटाळ होत असल्याकारणाने गटविमा गृहनिर्माण कृती समितीच्या सर्व सभासदांना उपोषणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नसल्याने अध्यक्ष आणि सचिव तसेच सभासद हे सर्व कागदपत्रे बिल्डरांकडून मिळेपर्यंत आणि कर्ज रकमे इतके घरांचे बांधकाम करूण देण्याचा आपसमजूत करारनामाद्वारे आश्वसित करेपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे देखील म्हटले आहे.
यावेळी कृती समितीचे अध्यक्ष फकीरा वाघ, सचिव श्रीकांत रूपदे, प्रताप बनकर, सुभाष म्हस्के, अतिश संघवी, रमेश गोल्डे, संजय हेरकर, सुरेश धानुरे, दत्तात्रय गायकवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
Leave a Reply